औरंगाबाद - पावसाळा सरताच मराठवाड्याला दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. दरम्यान, समन्यायी पाणी वाटपावरून सोमवारी गोदावरी पाटबंधारे महामंडळात जायकवाडी, नगर व नाशिक जिल्ह्यातील पाणीवापराबाबत सर्व मुख्य अभियंता व अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात जायकवाडी धरणात १७२ दलघमी (६.०७ टीएमसी) पाण्याची तूट असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे येत्या ३ दिवसांत जायकवाडीत पाणी सोडण्याचा निर्णय जाहीर केला जाणार असल्याची माहिती गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक अजय कोहिरकर यांनी दिली. मात्र, कोणत्या धरणातून पाणी सोडायचे याचा निर्णय घेण्याच्या आधीच विरोध सुरू झाला आहे.
नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी औरंगाबादेत येऊन नगरमधून पाणी सोडू नये, असे निवेदन कार्यकारी संचालकांना दिले आहेत. दुसरीकडे, नाशिकच्या अभियंत्यांनीही पाणी सोडण्यास विरोध दर्शवला. यामुळे पाणी वाटपाच्या मुद्द्यावरून संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. जायकवाडी व वरच्या धरणांतील पाणीसाठ्यावरील ही बैठक साडेतीन तास चालली.
३१ ऑक्टोबरपूर्वीच प्रक्रिया : यंदा पहिल्यांदाच १५ ऑक्टोबरला ही बैठक झाली. सामान्यपणे ही बैठक ३-४ दिवसांनीच व्हायची. प्राधिकरणाच्या निर्णयानुसार ३१ ऑक्टोबरपूर्वीच पाणी सोडण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.२०१५ मध्ये १२ टीएमसी पाणी : २०१५ मध्ये जायकवाडीत १२.८४ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय झाला. प्रत्यक्षात १०.८४ टीएमसीच पाणी सोडले. वरच्या भागातून सोडलेले पाणी व ते पोहोचेपर्यंत होणारा अपव्यय पाहता उर्वरित पाणी सोडले नव्हते.
निवडणुकांच्या हंगामात वाद : पुढील वर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका असल्यामुळे पाणी सोडण्याचा मुुद्द्याला राजकीय वळण लागू शकते. आदेश निघाल्यानंतर नगर-नाशिकचे शेतकरी पुन्हा न्यायालयात जाऊ शकतात.बंदोबस्तात पाणी सोडणार
वरच्या भागातल्या व जायकवाडीच्या पाण्याचा हिशेब केला. कोणत्या भागातून पाणी सोडल्यानंतर काय परिणाम होऊ शकतो याची माहिती घेतली आहे. बंदोबस्तात पाणी सोडण्यात येईल. - अजय कोहिरकर, कार्यकारी संचालक,गोदावरी पाटबंधारे महामंडळअसा झाला पाण्याचा वापर
समूह साठा वापर शिल्लक
मुळा ५९४ १८९ ४०५
प्रवरा ६०२ ९६ ५०६
गंगापूर ३१४ ६८ २४६
गोदा-दारणा ७१४ १६५ ६०९
पालखेड ३९८ १०० २९८
जायकवाडी - ४४१ दलघमीचा वापर. | ७९५ दलघमी शिल्लक
समन्यायीचा वाद : ३१ ऑक्टोबरपूर्वी जायकवाडीमध्ये विसर्गाच्या निर्णयाची अंमलबजावणी करावीच लागणारजायकवाडीकडे दुष्काळ नाही : नगरचे शेतकरी
नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर भागातील शेतकरी सुरेश ताके, जितेंद्र भोसले, रामचंद्र पटारे, दिलीप गलांडे, राजेंद्र भांड, बाळासाहेब भालेराव यासह इतर शेतकऱ्यांनी औरंगाबादेत येऊन अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यानुसार, जायकवाडीत सध्या पाणी सोडण्याची गरज नाही. लाभक्षेत्रात कुठलाही दुष्काळ नाही. त्यामुळे पाणी सोडू नये....तर जायकवाडीचा साठा येईल ६५ टक्क्यांवर
जायकवाडीत ५६% पर्यंत पाणी वापरासह पाणीसाठा झाला होता. यामुळे प्राधिकरणाच्या तक्ता क्र. ६मधील पर्याय क्र. ३ सूत्रानुसार ६५% पेक्षा कमी साठा असल्यास वरच्या धरणांतून पाणी सोडणे बंधनकारक आहे. साठा ६५% होण्यासाठी १७२ दलघमी पाणी लागणार आहे.३ दिवसांत विसर्गाचा निर्णय
१ जुलै ते १५ ऑक्टोबर कालावधीतील नगर-नाशिकच्या खरिपाच्या पाण्याचा वापराचा आढावा घेण्यात आला. नगर-नाशिकचा एकूण पाणीसाठा, वापरलेले पाणी आणि शिल्लक असलेल्या पाण्याचा हिशेब करण्यात आला. कोणत्या धरणातून किती पाणी आता सोडावे लागेल याचा निर्णय येत्या ३ दिवसांत होणार आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment