0
      • Nirav modi froud with Paul Alphonsoओटावा - पीएनबीला १३ हजार कोटींनी फसवून फरार झालेला हिरा व्यापारी नीरव मोदीने कॅनडातील पेमेंट प्रोसेसिंग कंपनीच्या सीईओलाही गंडा घातला. नीरवने कॅनडातील पॉल अल्फोन्सो यांना २ लाख डाॅलर्सच्या (१.४७ कोटी रु.) दोन नकली हिऱ्याच्या अंगठ्या विकल्या. त्यांनी प्रेयसीशी साखरपुड्यासाठी ही खरेदी केली होती. अंगठीतील हिरे नकली असल्याचे कळल्यावर तिने साखरपुडाच मोडला. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, अल्फोन्सो-नीरवची २०१२ मध्ये अमेरिकेत बेव्हर्ली हिल्स हॉटेलमध्ये ओळख झाली होती. एप्रिलमध्ये अल्फोन्सोने नीरवला साखरपुड्यासाठी खास अंगठ्या बनवायची ऑर्डर दिली. अल्फोन्सोने १ लाख डॉलरपर्यंतचे (७३.९५ लाख रु.) बजेट निश्चित केले. परंतु नीरवने ३.२ कॅरेटच्या हिऱ्याच्या अंगठीचे ८८.७३ लाखांचे बिल दिले. पहिली अंगठी अावडल्यानंतर अल्फोन्सोच्या प्रेयसीने २.५ कॅरेट हिऱ्याची दुसरी अंगठी तयार करण्याची ऑर्डर दिली. ८० हजार डॉलर (५९.१५ लाख रुपये) दिले. यानंतर जूनमध्ये अल्फोन्सोने दोन्ही अंगठ्या घेऊन प्रेयसीला लग्नाची मागणी घातली आणि त्यांचा साखरपुडा झाला.

        अल्फोन्सो वाग्दत्त वधू अंगठ्यांची तपासणी करू इच्छित होते. पण नीरवने त्यांना हिऱ्याचे प्रमाणपत्र दिले नाही. अल्फोन्सोने अनेकदा ईमेल केला होता. अखेर ऑगस्टमध्ये अल्फोन्सो यांच्या वाग्दत्त वधूने पत्नीने जवाहिऱ्याकडून अंगठ्या तपासल्या. त्यातील हिरे नकली असल्याचे कळल्यावर तिने साखरपुडाच मोडला. यानंतरच अल्फोन्सो यांना नीरवने फसवणूक केल्याचे कळले.
        प्रेयसीचा टोमणा : तू तर खूपच हुशार आहेस, तुझ्यासोबत राहू शकत नाही 
        अल्फोन्सोची प्रेयसी टोमणा मारत त्यांना म्हणाली, 'तू खूप हुशार आहेस. हिऱ्यांची पारख न करताच २ लाख डॉलर देऊन टाकले. आता तुझ्यासोबत राहणे शक्य नाही'. साखरपुडा मोडल्यानंतर अल्फोन्सोने नीरवला पाठवलेल्या ईमेलमध्ये म्हटले अाहे की, 'तू मला किती दु:ख दिले हे तुला नाही कळणार. तू जीवनातील खास क्षण नष्ट केलेस.' अल्फोन्सोने आता कॅलिफोर्नियातील उच्च न्यायालयात नीरवविरुद्ध ३०.६६ कोटी नुकसान भरपाईचा दावा गुदरला आहे. जानेवारी २०१९ मध्ये प्रकरणाची सुनावणी होई
    You Might Also Likeओटावा - पीएनबीला १३ हजार कोटींनी फसवून फरार झालेला हिरा व्यापारी नीरव मोदीने कॅनडातील पेमेंट प्रोसेसिंग कंपनीच्या सीईओलाही गंडा घातला. नीरवने कॅनडातील पॉल अल्फोन्सो यांना २ लाख डाॅलर्सच्या (१.४७ कोटी रु.) दोन नकली हिऱ्याच्या अंगठ्या विकल्या. त्यांनी प्रेयसीशी साखरपुड्यासाठी ही खरेदी केली होती. अंगठीतील हिरे नकली असल्याचे कळल्यावर तिने साखरपुडाच मोडला. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, अल्फोन्सो-नीरवची २०१२ मध्ये अमेरिकेत बेव्हर्ली हिल्स हॉटेलमध्ये ओळख झाली होती. एप्रिलमध्ये अल्फोन्सोने नीरवला साखरपुड्यासाठी खास अंगठ्या बनवायची ऑर्डर दिली. अल्फोन्सोने १ लाख डॉलरपर्यंतचे (७३.९५ लाख रु.) बजेट निश्चित केले. परंतु नीरवने ३.२ कॅरेटच्या हिऱ्याच्या अंगठीचे ८८.७३ लाखांचे बिल दिले. पहिली अंगठी अावडल्यानंतर अल्फोन्सोच्या प्रेयसीने २.५ कॅरेट हिऱ्याची दुसरी अंगठी तयार करण्याची ऑर्डर दिली. ८० हजार डॉलर (५९.१५ लाख रुपये) दिले. यानंतर जूनमध्ये अल्फोन्सोने दोन्ही अंगठ्या घेऊन प्रेयसीला लग्नाची मागणी घातली आणि त्यांचा साखरपुडा झाला.

    अल्फोन्सो वाग्दत्त वधू अंगठ्यांची तपासणी करू इच्छित होते. पण नीरवने त्यांना हिऱ्याचे प्रमाणपत्र दिले नाही. अल्फोन्सोने अनेकदा ईमेल केला होता. अखेर ऑगस्टमध्ये अल्फोन्सो यांच्या वाग्दत्त वधूने पत्नीने जवाहिऱ्याकडून अंगठ्या तपासल्या. त्यातील हिरे नकली असल्याचे कळल्यावर तिने साखरपुडाच मोडला. यानंतरच अल्फोन्सो यांना नीरवने फसवणूक केल्याचे कळले.
    ..

Post a Comment

 
Top