0
  • जयपूर - 'ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन' (एबीसी) या वृत्तपत्रांचे वितरण प्रमाणित करणाऱ्या देशातील सर्वोच्च संस्थेने आपल्या जानेवारी ते जून २०१८ च्या अहवालात दैनिक भास्करला १५ लाख ९४ हजार प्रतींसह राजस्थानमधील सर्वाधिक खप असलेले वृत्तपत्र म्हणून घोषित केले आहे.
    दैनिक भास्करने १९९६ मध्ये जयपूर येथून राजस्थानमधील प्रवास सुरू केला होता आणि पहिल्याच वर्षी ते जयपूरचे सर्वाधिक वाचले जाणारे वृत्तपत्र ठरले होते. जयपूरनंतर काही वर्षांत भास्कर राजस्थानमध्ये १७ आवृत्त्या, १७ छपाई प्रकल्प आणि ४० ब्युरो असलेल्या सर्वात मोठ्या नेटवर्कसह आता संपूर्ण राजस्थानचे सर्वाधिक खप असलेले वृत्तपत्रही ठरले आहे. अभिमान वाटावा अशा या क्षणी आम्ही आमच्या प्रत्येक वाचक कुटुंबाबद्दल कृतज्ञ आहोत. त्यांच्यामुळेच आम्ही हा एेतिहासिक टप्पा गाठू शकलो. आम्ही पुन्हा आमचे स्वर्गवासी चेअरमन रमेशजींच्या संकल्पाचा पुनरुच्चार करत आहोत. त्यात त्यांनी म्हटले होते की, भास्कर सूर्याप्रमाणे सर्वांचा आहे आणि ज्याप्रमाणे सूर्याच्या प्रत्येक किरणावर सर्वांचा हक्क आहे, त्याचप्रमाणे भास्करची प्रत्येक बातमी आणि विचारावर त्याच्या वाचकांचा हक्क आहे. आपल्याला जागतिक स्तराचे आणि सर्वोत्तम वृत्तपत्र देण्यासाठी आम्ही सदैव वचनबद्ध आहोत. विशेष म्हणजे भास्कर समूह आज देशातील सर्वात मोठा भाषिक माध्यम समूह आहे. भास्कर समूहाच्या १२ राज्यांत ६६ आवृत्त्या आणि ४ भाषांतील वृत्तपत्रे रोज प्रकाशित होतात.Dainik Bhaskar Rajasthan's most broadcasted newspaper in ABC report

Post a Comment

 
Top