0
  • यावल- लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत पत्नीच्या नावावर आपल्या शेती क्षेत्रा काही भाग लावण्याकरिता पंधरा हजारांची लाच मागितल्याप्रकरणी यावल तहसील कार्यालयाच्या अव्वल कारकुन विरोधात यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयीताचे नाव विजय पुंडलिक पाटील असे आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी सायंकाळी केली.

    तालुक्यातील फैजपूरप्रांत कार्यालयातील नायब तहसीलदारावर गुरुवारी व लागलीच दुसऱ्या दिवशी शुक्रवारी यावल तहसिल कार्यालयात झालेल्या अँटी करप्शनच्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.
    तालुक्यातील टेंभी शेती शिवारात यावल शहरातील एका व्यक्तीची शेती आहे. त्या शेत गट क्रमांक 53/2 मधील 2.23 हे. आर. हे लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत त्यांना त्यांच्या पत्नीच्या नावे लावायची होती तेव्हा ते दिनांक 25 जुलै 2018 रोजी टेंभी येथील तलाठी श्रीमती सरदार यांना भेटले तेव्हा त्यांनी या बाबत निवृत्त मंडळाधिकारी गुरव यांना भेटायचे सांगीतले मात्र, सेवानिवत्त मंडळाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने सदरील काम होणार नाही म्हणुन तक्रारदार हे यावल तहसिल कार्यालयात अव्वल कारकून विजय पुंडलिक पाटील (रा. सुयोग कॉलनी, एम.जे. कॉलेजमागे जळगाव) यांना भेटले तेव्हा पाटील यांनी तक्रारदाराला सातबारा, आधारची माहिती, लक्ष्मी मुक्ती योजनेचा शासन निर्णय आदी कागदपत्र घेवून सोबत 15 हजार रूपये दिल्यास त्यांचे काम होईल, असे सांगितले. तेव्हा तक्रारदाराने थेट लाच लुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव कडे तक्रार केली. तक्रारदाराच्या तक्रारीची पडताळणी 6 ऑगस्ट 2018 रोजी करण्यात आली. त्यात पाटील यांनी 15 हजाराची मागणी केल्याचे निष्पन्न झाले, संपूर्ण कायदेशीर कार्यवाही अंती शुक्रवारी सांयकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पाटील यांना ताब्यात घेतले व त्यांच्यावर यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    दुसऱ्या कारवाईने खळबळ...
    फैजपूरात गुरूवारी प्रांताधिकारी कार्यालयातील नायब तहसिलदारा पी. सी. धनगर यांनी दिड लाखांची लाख घेतांना कारवाई झाली व लागलीचं दुसऱ्या दिवशी यावल तहसिल कार्यालयात अव्वल कारकून वर कारवाईने खळबळ उडाली .........

Post a comment

 
Top