- पुणे- राज्यात हुक्का पार्लरवर बंदी असतानाही कोरेगाव पार्क येथील एका हॉटेलमध्ये हुक्का पार्लर सुरु असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. बर्निंग घाट रोडवरील हॉटेल डार्क हॉर्सवर पोलिसांनी मंगळवारी छापा टाकला.कोरेगाव पोलिसांनी हॉटेल मालक व मॅनेजरवर गुन्हा दाखल केला असून तेथे हुक्का ओढणाऱ्या 20 तरुण-तरुणींवर खटले दाखल केले आहेत़.कोरेगाव पार्क पोलिस स्टेशन हद्दीतील हॉटेल डार्क हाऊस येथे हुक्का पार्लर सुरु असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून हॉटेलवर छापा टाकला. 19 ते 25 वयोगटात 12 तरुण आणि 8 तरुणी हुक्का ओढत असल्याचे आढळून आले. हॉटेल चालक व मालक यांच्यावर भारतीय दंड संविधान कलम 285 कोपता कलम 4 (अ), 21 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुणे- राज्यात हुक्का पार्लरवर बंदी असतानाही कोरेगाव पार्क येथील एका हॉटेलमध्ये हुक्का पार्लर सुरु असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. बर्निंग घाट रोडवरील हॉटेल डार्क हॉर्सवर पोलिसांनी मंगळवारी छापा टाकला.कोरेगाव पोलिसांनी हॉटेल मालक व मॅनेजरवर गुन्हा दाखल केला असून तेथे हुक्का ओढणाऱ्या 20 तरुण-तरुणींवर खटले दाखल केले आहेत़.कोरेगाव पार्क पोलिस स्टेशन हद्दीतील हॉटेल डार्क हाऊस येथे हुक्का पार्लर सुरु असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून हॉटेलवर छापा टाकला. 19 ते 25 वयोगटात 12 तरुण आणि 8 तरुणी हुक्का ओढत असल्याचे आढळून आले. हॉटेल चालक व मालक यांच्यावर भारतीय दंड संविधान कलम 285 कोपता कलम 4 (अ), 21 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment