मुंबई- पतीच्या डोळ्यादेखत पत्नी आणि 11 महिन्यांच्या चिमुकल्याला कचरा जमा करणाऱ्या डपंरने चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मानखुर्द-घाटकोपर लिंक रोडवर हा अपघात झाला.
मिळालेली माहिती अशी की, प्रमोद घडशी हे शनिवारी (ता. 27) पत्नी पूजा व 11 महिन्यांचा चिमुकला सामर्थसोबत दुचाकीवरून जात होते. डंपर चालकाने हॉर्न वाजवला. त्याला साईड देण्यासाठी प्रमोद हे दुचाकी बाजुला घेत असताना अचानक मोठा खड्डा आला. खड्ड्यात दुचाकी केली. प्रमोद यांच्यासह पूजा आणि सामर्थ रस्त्यावर पडले. मागून येणारा डंपर पूजा आणि समर्थच्या अंगावरून गेला. एका क्षणात प्रमोद घडशी यांचे कुटुंब उद्धवस्त झाले. या प्रकरणी देवनार पोलिसांनी डंपर चालक शम्मी उल्ला रहमत अली शहा याला अटक केली आहे.
You Might Also Like
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment