0
लखनौ- पतीसोबत झालेल्या भांडणानंतर एका महिलेने 11 व्या मजल्यावरून खाली उडी घेऊन आत्महत्या केली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिलेला नातेवाईक आणि शेजारच्यांनी तातडीने हॉस्पिटलमध्ये हलविले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. शहरातील गोमतीनगर विस्तारमधील बेतवा अपार्टमेंटमध्ये सोमवारी ही घटना घडली.

पोलिसांनी सांगितले की, मागील काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये वाद सुरु होते. याप्रकरणी तपास सुरु आहे.

काय आहे हे प्रकरण?

- कानपूर येथील राहाणारे आलोक चौहान हे पत्नी सुमिती आणि दोन मुलांसोबत (आर्यन आणि यश) बेतवा अपार्टमेंटमधील ई-ब्लॉकच्या फ्लॅट नंबर 1103 मध्ये भाड्याने राहात होते.
- आलोक हे एमआर होते ते सुमिती ही हाऊसवाइफ होती. चौकशीत आर्यनने सांगितले की , सोमवारी सायंकाळी 7 वाजता मम्मी-पप्पांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते.

- नंतर आलोकने दोन्ही मुलांना एका खोलीत कैद केले. दोघांमध्ये वाद एवढा वाढला की आलोकने पत्नीच्या कानशिलात ओढून दिली.नंतर तिला मारहाणही केली. सुमिती जोरजोरात आरोडाओरड करत होती. नंतर ती धावतच आली आणि गॅलरीतून तिने खाली उडी मारली.
- 11 व्या मजल्यावरून उडी मारताना सुमिती 8 व्या मजल्याच्या बाल्कनीत ठवलेल्या एका रोपट्याच्या कुंडीला धडकली. नंतर ती जमिनीवर कोसळली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.
- रक्ताच्या थारोळ्यात तिला हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

पोलिसांनी फ्लटमधील सोफ्यावर सुमितीच्या तुटलेल्या बांगड्या सापडल्या. तसेच घरातील फरशीवर रक्तही साडलेले दिसले. घटनेच्या आधीचे भयावह चित्र दाखवत होते.

- घटनेच्या आधी आलोक आणि मुले टीव्ही पाहात होते. सुमिती किचनमध्ये चहा करत होती. तितक्यात दोघांमध्ये कडाक्याचे भांडण सुरु झाले. सुमितीच्या मृत्यू नंतर आलोक आणि दोन्ही मुलांचे अश्रु थांबत नाही आहेतWomen Jumped From 11th floor in Lucknow

Post a Comment

 
Top