0
  • बॉलिवूड डेस्कः अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर सेक्शुअल हॅरेसमेंटचा आरोप लावला आहे. हे प्रकरण दहा वर्षे जुने आहे. पण त्या दिवशी सेटवर नेमके काय घडले होते, हे दाखवणारा हा व्हिडिओ आहे. त्यादिवशी हॉर्न ओके प्लीज या चित्रपटातील नथनी उतार... या गाण्याचे चित्रीकरण सुरु होते. याच चित्रीकरणाच्या वेळी नानाने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप तनुश्रीने त्यांच्यावर लावला आहे. व्हिडिओत तनुश्री एकटी डान्स प्रॅक्टिस करताना दिसतेय. थोड्या वेळाने सेटवर नाना पाटेकरांची एन्ट्री होती. ते आल्यानंतर तनुश्री अपसेट झाल्याचे या व्हिडिओत स्पष्ट बघायला मिळत आहे. त्यानंतर तनुश्री सेट सोडून निघून जाते. सेटवर बराच वेळ सगळेजण तनुश्रीची वाट बघत असतात. समजूत घातल्यानंतर तनुश्री सेटवर परत येते... तिला डान्स प्रॅक्टिस करताना नाना पाटेकर बघत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. पण थोड्या वेळाने पुन्हा एकदा तनुश्री नाराज होऊन सेटवरुन निघून जाते, पण नंतर ती परत येत नाही. हे गाणे कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी कोरिओग्राफ केले होते. जेव्हा तनुश्री सेटवर परतली नाही, तेव्हा गणेश आचार्य यांनी तिचे वागणे अनप्रोफेशनल असल्याचे म्हटले होते. 2008 मध्ये दिलेल्या मुलाखतीत गणेश आचार्य म्हणाले होते की, सेटवर शेकडोच्या संख्येने लोक उपस्थित असताना कुणी कुणाची छेड कशी काढू शकतो.

    - या घटनेनंतर तनुश्री चित्रपटातून बाहेर झाली होती आणि तिच्या ऐवजी राखी सावंतवर हे आयटम साँग चित्रीत करण्यात आले 

Post a comment

 
Top