- नवी दिल्ली- एका नामांकीत एअरलाईन्समध्ये काम करणार्या तरुणीसोबत तिच्या प्रियकराने 10 तास तिच्या घरात डांबून ठेवले. आपल्याच घरात बंदीस्त असलेल्या तरुणीला घराबाहेर पडण्यासाठी रात्रभर संघर्ष करावा लागला. परंतु तिला यश आले नाही. यादरम्यान, तिने तरुणाच्या छातीवर नखे मारले. मात्र, आरोपीने चाकूचा धाक दाखवून तिला जिवे मारण्याची धमकी दिली.
संधी मिळताच पीडित तरुणीने आईला फोन करून आपबिती सांगितली. नंतर आरोपी तिचा फोन आणि 2000 रुपये घेऊन पसार झाला. पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून वसंतकुंज नार्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी गुडगाव येथे राहातो. पोलिसांनी अद्याप त्याला अटक केली नाही.पीडित तरुणी आणि आरोपी रिलेशनशिपमध्ये होते. परंतु काही दिवसांपूर्वी दोघांचे ब्रेकअप झाले होते. आरोपी पीडितेची समजूत काढण्यासाठी आला होता.2 वर्षांपासून एअरलाइन्स कंपनीत कार्यरत आहे युवतीपीडित तरुणी महिपालपूर परिसरात आईसोबत राहाते. ती मूळची पंचकुला (हरियाणा) येथील आहे. 2वर्षांपासलून एअरलाइन्स कंपनीत कॅबिन क्रू या पदावर कार्यरत आहे. घटनेच्या दोन दिवस आधी तिची आई पंचकुला येथे गेली होती. आरोपीने याचा फायदा घेऊन ते पीडितेच्या घरी आला. परंतु पीडितेने दरवाजा उघडला नाही. नंतर आरोपी तिथून निघून गेला. मात्र, त्यानंतर एक तासाने तरुणीच्या घरात गटारीचे पाणी घुसले. ते पाहून तरुणीने दरवाजा उघडला असता तितक्यात आरोपी तिला धक्का देत घरात घुसला. तेव्हा रात्रीचे 11 वाजले होते. त्याने पीडितेला तिच्याच घरात डांबून ठेवले. तब्बल 10 तास तिची शारीरिक आणि मानसिक पिळवणूक केली.संधी मिळताच पीडित तरुणीने आईला फोन करून आपबिती सांगितली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment