0
  • blob:https://ultima.bhaskar.com/2930342b-ee33-4181-a17d-8902b849d217मुंबईः 2008 मध्ये आलेल्या 'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटाच्या सेटवरील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. या व्हिडिओत काही लोक तनुश्री दत्ताच्या गाडीवर हल्ला करताना दिसत आहेत. कारमध्ये तनुश्री बसलेली असून लोक कारच्या वर उड्या मारत आहेत, तर एक जण तिच्या गाडीचा टायर पंक्चर करताना दिसतोय. एकाने तिच्या गाडीचा काचही फोडला. हा व्हिडिओ 10 वर्षे जुना असून नाना पाटेकरांवर नाराज होऊन तनुश्री चित्रपटाच्या सेटवरुन निघून जात असताना शूट करण्यात आला होता.

    नानावर तनुश्रीने लावले आहेत हे आरोप... 
    - तनुश्री या चित्रपटात एक आयटम नंबर करणार होती. नाना पाटेकरांसोबत झालेल्या वादानंतर तिला राखी सावंतने रिप्लेस केले होते. तनुश्रीने नानांवर तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप लावला आहे. गाण्याच्या शूटिंगवेळी नानांनी निर्माते सामी सिद्दीकीला गाण्यात इंटीमेट सीन टाकायला सांगितले आणि त्यांनी तनुश्रीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, असे तनुश्री दत्ता म्हणाली आहे.
    - तनुश्रीने अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत पुढे सांगितले की, जेव्हा तिने नाना पाटेकरांना यासाठी विरोध केला आणि ती तेथून निघून जाण्याचा प्रयत्न करु लागली, तेव्हा नानांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना बोलावून तिच्यावर जीवघेणा हल्ला घडवून आणला होता. त्यावेळी इंडस्ट्रीतून कुणाचाही पाठिंबा आपल्याला मिळाला नसल्याचे तनुश्रीने सांगितले. अखेर ती हा देश सोडून निघून गेली होती.

    - आता जेव्हा तनुश्रीने या घटनेविषयी आपले मौन सोडले तेव्हा तिला बॉलिवूडमधून अनेक सेलिब्रिटींचे समर्थन मिळत आहे. कंगना रनोट, प्रियांका चोप्रा, ट्विंकल खन्ना, फरहान अख्तर, सोनम कपूर यांच्यासह अनेकांनी तिला समर्थन दिले आहे.

Post a comment

 
Top