- लोवा - अनेकवेळा चेहऱ्यावर दिसणारे सामान्य व्रण एखाद्या गंभीर आजाराची सुरुवात असू शकतात. अमेरिकेतील एक वर्षाच्या मुलासोबत असेच काहीसे घडले आहे. मुलाच्या ओठांवर रक्ताचे व्रण पाहून त्याच्या आईला वाटले की, फ्लू मुळे मुलाला असे झाले असेल. परंतु हे गोष्टीचे सत्य मुलाची तब्येत जास्त बिघडत गेल्यानंतर समोर आले. डॉक्टरांनी सांगितले की, हा एखादा सामान्य व्रण नसून हर्प्स नावाचा आजार आहे. हा आजार आयुष्यभर याच्यासोबतच राहील.
चेकअपमध्ये समोर आला हा गंभीर आजार
- ही घटना लोवा येतील आहे. येथे राहणारी महिला सामंथाला आपला 1 वर्षाचा मुलगा जुलियानोच्या चेहऱ्यावर काही व्रण दिसले. सुरुवातीला तिला हे फ्लूमुळे झाले असावे असे वाटले. हे व्रण जास्तच वाढू लागल्यानंतर तिला हा तोंडाचा एखादा आजार असेल असे वाटले.
- काही दिवसांनी जुलियानोचे हे व्रण तोंडापासून पसरत गळा आणि पोटापर्यंत पसरले. त्यानंतर सामंथा त्याला घेऊन डॉक्टरांकडे गेली.
- डॉक्टरांनी जुलियानोची हर्प्स म्हणजे व्हायरस टाइप 1 टेस्ट केली आणि याचा रिझल्ट पॉझिटिव्ह आला. हा मुलगा हर्प्स पीडित असल्यामुळे आता आयुष्यभर हा आजार याच्या सोबतच राहणार.
- डॉक्टरांनी सांगितले की, या आजरामध्ये वारंवार ताप येतो.
इतर पालकांना करत आहे अलर्ट
- त्यानंतर जुलियानोची ट्रीटमेंट सुरु करण्यात आली. याचा पॉझिटिव्ह प्रभावही दिसून आला परंतु हा आजार त्याच्या आयुष्यातून जाणार नाही.
- सामंथाला माहिती नव्हते की, कशामुळे तिच्या मुलाला हे इन्फेक्शन झाले. परंतु ती आता इतर पालकांना सजग राहण्याचा सल्ला देत आहे. सामंथाने अपील केले आहे की, सर्व पालकांनी आपली मुले कोणाच्या संपर्कात येत आहेत याकडे विशेष लक्ष द्यावे.
- डॉक्टरांनी सांगितले की, कोल्डसोर पीडित व्यक्तीने स्पर्श केल्यास किंवा इन्फेक्टेड स्लावियाच्या संपर्कात आल्याने हा आजार होऊ शकतो. लहान मुलांना हा आजार लवकर होण्याची शक्यता राहते.आता आयुष्यभर राहणार हा आजार, इतर पालकांसाठी अलर्ट आहे ही बातमी
-
-
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a comment