0
मुरादाबाद, यूपी - मुरादाबादमध्ये गणेश विसर्जनादरम्यान रामगंगा नदीमध्ये एक दुर्घटना झाली. दो मुली अचानक खोल पाण्यात गेल्या. लोकांची त्यांच्यावर नजर जाताच आरडाओरड सुरू झाली. यादरम्यान, ज्यांना पोहता येत होते, त्यांनी ताबडतोब मुलींना वाचवण्यासाठी रामगंगा नदीमध्ये उड्या मारल्या. तेथे उभी एक व्यक्ती ज्यांचे नाव ब्रह्मपाल सिंह असल्याचे सांगितले जात आहे, त्यांनी या पूर्ण घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाइलमधून शूट केला.दोन्ही मुलींची प्रकृती स्थिर
व्हिडिओ फुटेजमध्ये जे लोक नदीमध्ये उडी मारायचे त्यांनी कसेबसे या दोन्ही मुलींना बुडण्यापासून वाचवले. परंतु तोपर्यंत पोटात पाणी गेल्याने दोन्ही मुली बेशुद्ध झाल्या होत्या. दोन्ही मुलींना तेथून ताबडतोब नजीकच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. घटना मंगळवार संध्याकाळची आहे. सध्या दोन्ही मुलींची प्रकृती स्थिर आहे. त्यांचे कुटुंबीय हॉस्पिटलमधून त्यांना घरी घेऊन गेले. मुरादाबाद जिल्ह्यातील कटघरमध्ये रामगंगाच्या कृष्णा नंद घाटातील आहे. मंगळवारी संध्याकाळी मोठ्या संख्येने भाविक गणपती विसर्जनासाठी पोहोचले होते. गणपती विसर्जनानंतर लोक नदीमध्ये अंघोळ करत होते. त्यादरम्यान हा अपघात झाला.Up : drowning girls rescued in Moradabad Viral Video News


Post a Comment

 
Top