0
  • मुंबई- 'देव तारी त्याला कोण मारी', या म्हणीचा प्रत्यय नुकताच ठाण्यात आला आहे. एका सोसायटीच्या कंपाउंडमध्ये मुले फुटबॉल खेळत होते. एका महिलेची कार चक्क मुलाच्या अंगावरून गेली. मा‍‍त्र, त्याला साधा ओरखडा देखील आला नाही. ही चमत्कारीक घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे. 24 सप्टेंबरला सायंकाळी 7वाजेच्या सुमारास घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
    नेमके काय आहे .
    काही मुले फुटबॉल खेळताना दिसत आहेत. एक महिला वॅगन आर कारमध्ये बसताना दिसते. लाल रंगाचे टीशर्ट परिधान केलेला मुलगा खेळता खेळता बुटाची लेस बांधण्यासाठी जमिनीवर बसतो. तितक्यात महिला कार पुढे घेते. कार चक्क मुलाच्या अंगावरून जाते, तरी देखील महिलेला साधी कल्पनाही येत नाही. ती निघून जाते. कार पुढे गेल्यानंतर मुलगा उठतो आणि पुन्हा फुटबॉॅल खेळायला लागतो.

    कार चक्क मुलाच्या अंगावरून जाते, तरी देखील महिलेला साधी कल्पनाही येत नाही. ती निघून जाते.

    • a boy alive after a car run over him at Thane Mumbai

Post a comment

 
Top