0
  • मॉस्को - रशियात एक महिला आपल्या 8 महिन्यांच्या मुलाचे वर्तन अचानक बदलल्याचे पाहून त्रस्त होती. घरात मोलकरीण येताच हा चिमुकला मोठ-मोठ्या रडायचा. शेवटी आईने याचे मूळ शोधून काढण्याच्या प्रयत्न आपल्या घरामध्ये एक गुप्त कॅमेरा लपविला आणि बाळाची संपूर्ण दिनचर्या रेकॉर्ड केली. रेकॉर्डिंग पाहिली तेव्हा आईच्या पायाखालची जमीनच घसरली. फुटेजमध्ये मोलकरीण त्या अवघ्या 8 महिन्यांच्या मुलाला मारहाण करून आपटताना दिसून आली.


    नेमके काय होते त्या व्हिडिओमध्ये?
    > रशियातील नेफ्तेयुगान शहरात ही घटना फेब्रुवारी महिन्यात समोर आली. येथे राहणारी 26 वर्षीय अॅलेना आपल्या मुलाच्या सततच्या रडण्यावरून वैतागली होती. अॅलेनाने सांगितल्याप्रमाणे, तिची मोलकरीण घरात प्रवेश करताच बाळ जोर-जोरात ओरडून रडायला सुरुवात करत होता. अखेर तिने याचा शोध घेण्याचे ठरवले आणि घरात कुणालाही न सांगता एक सीक्रेट कॅमेरा लपवला. यानंतर तिला आपल्या मुलाच्या रडण्याचे खरे कारण कळाले. 
    > फुटेजमध्ये मुलाचा सांभाळ करण्यासाठी लावलेली मोलकरीण त्याला दूध देण्याचा प्रयत्न करत होती. मुलाने नकार दिला तेव्हा तिने अचानक त्याच्या हात आणि पायांवर चापट मारण्यास सुरुवात केली. एवढेच नव्हे, तर बाळाच्या नकारावर ती इतकी संतापली की तिने त्याला सोफ्यावरून एक पाय ओढून जमीनीवर आपटले. यानंतर त्याला रडताना सोडून निघून गेली. व्हिडिओ पाहिल्यानंतर 31 नॅनी अनस्तासिया हिला पोलिसांनी अटक केली. तसेच कोर्टाने तिच्या विरोधात बालकावर हिंसाचाराचा खटला दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची सुनावणी अजुनही सुरू असून तिला कमाल 10 वर्षांची कैद होऊ शकते.
    Mother installs Secret CCTV cameras after baby cries and Found sickening truth

Post a Comment

 
Top