0
स्पोर्ट्स डेस्क - आशिया चषकात भारत विरुद्ध पाकिस्तानचा बहुप्रतीक्षित सामना बुधवारी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर ट्विटरवर टेनिस स्टार सानिया मिर्झाला ट्रोल करण्यात आले. सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोल्समुळे सानिया इतकी वैतागली की तिने नेटिझन्सला प्रत्युत्तर दिले. हा केवळ एक क्रिकेट सामना असून किमान प्रेगनेंट महिलेला एकटी सोडा असे आवाहन तिने केले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, या सामन्यात सानिया मिर्झाचा पती शोएब मलिक सुद्धा पाकिस्तानी संघाकडून खेळत आहे. भारतीय टेनिस स्टार भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात आपल्या पतीला चिअर करते की देशाला अशा प्रकारचे प्रश्न विचारून तिला नेहमीच ट्रोल केले जाते. परंतु, यावेळी सानियाने सर्वांना उत्तर दिले आहे.
भारत आणि पाकिस्तानचा सामना सुरू होण्याच्या काही तासांपूर्वीच सानिया मिर्झाला सोशल मीडियावर विचित्र प्रतिक्रिया मिळाल्या. यावरून ती वैतागली होती. त्यामुळेच, तिने तिची थट्टा मस्करी करणाऱ्यांना उत्तर देताना लिहिले, "मॅच सुरू होण्यासाठी 24 तास सुद्धा राहिलेले नाहीत. अशात काही दिवस सोशल मीडियावरून साइन आउट करणेच योग्य ठरेल. काही लोक एका सामान्य व्यक्तीला सुद्धा आजारी करू शकतात. एका प्रेगनेंट महिलेला तरी किमान एकटी सोडा. हा केवळ एक क्रिकेट सामनाच आहे." सानियाच्या या मेसेजचे अनेकांनी समर्थन केले.

हा केवळ एक क्रिकेट सामना असून किमान प्रेगनेंट महिलेला एकटी सोडा असे आवाहन तिने केले आहे.

  • Sania Mirza trolled Ahead Of India vs Pakistan Match Hits Back

Post a comment

 
Top