0
 • संगरूर (पंजाब) - येथे एका युवकाला आपल्याच जीवलग मित्राच्या खून प्रकरणी अटक करण्यात आली आहे. गावातील माजी सरपंचाचा पुतण्या असलेल्या जसविंदर सिंग उर्फ बगा (25) च्या मारेकऱ्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. जसविंदरला ठार मारण्यासाठी आरोपीने त्याचे डोके आणि चेहरा दगड विटांनी ठेचला. यानंतरही जिवंत राहू नये यासाठी त्याच्या तोंड आणि नाकात माती आणि विटांचा चुरा भरला. पोलिसांनी जेव्हा आरोपीला कारण विचारले. तेव्हा त्याचे उत्तर धक्कादायक होते.


  भेटताच मिश्यांना पीळ द्यायचा, म्हणून ठार मारले...
  - संगरूरचे पोलिस उपाधीक्षक संदीप गर्ग यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, 7 सप्टेंबर रोजी सकाळी बलियाल रोडवर जसविंदर सिंगचा मृतदेह सापडला होता. त्याचा मारेकरी कुलविंदर सिंग याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा मान्य केला. जसविंदर सिंग आपला जीवलग मित्र होता असेही त्याने म्हटले आहे.
  - आरोपीने सांगितले, की त्या दिवशी जसविंदर आणि तो एका पार्टीतून परतले होते. दोघांनी भरपूर मद्यपान केले होते. नशेतच असताना आरोपी जसविंदरला बलियाल रोडच्या एका गोदामात घेऊन गेला. याच ठिकाणी त्याने दगड आणि विटांनी जसविंदरचे शिर ठेचले. तरीही जिवंत वाचल्यास आपले नाव घेईल या भीतीने त्याने जसविंदरचा श्वास रोखण्यासाठी त्याच्या तोंडात माती भरली. जसविंदर जेव्हा-जेव्हा आपली भेट घ्यायचा तेव्हा मिशा दाखवून त्यांना पीळ द्यायचा. जसविंदरच्या या वागण्यावरून आपण चिडलो होतो आणि रागात त्याचा खून केला अशी कबुली आरोपीने दिली.

  चप्पलने पकडला गेला आरोपी...
  पोलिसांनी शंका येऊ नये यासाठी आरोपी चौकशी दरम्यान पोलिसांसोबतच राहत होता. घटनेच्या दिवशीची सीसीटीव्ही फुटेज तपासला असता आरोपी जसविंदरसोबत दिसून आला. व्हिडिओमध्ये आरोपीने गोदामात जाताना चप्पल घातली होती. परंतु, बाहेर पडताना तो परत घालण्यास विसरला आणि तसाच घाई-घाईत निघून गेला. ती चप्पल पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केली आणि आरोपीला पकडून आणले.
  Man kills friend for shocking reason in punjab

Post a comment

 
Top