0
मुंबई - दहा दिवसांच्या मुक्कामानंतर रविवारी गणपती बाप्पाने भक्तांचा निरोप घेतला. अत्यंत भावपूर्ण मनाने लाडक्या गणपती बाप्पाला भाविकांनी निरोप दिला. मुंबईतील मानाचा गणपती समजला जाणारा मुंबईचा राजा म्हणजेच गणेश गल्लीच्या राजाचे गिरगाव चौपाटीवर विसर्जन करण्‍यात आले. त्या पाठोपाठ लालबागच्या राजाचेही विसर्जन करण्यात आले.
लालबागच्या राजाचे विसर्जन
सकाळी साडे आठच्या दरम्यान लालबागच्या राजाचे विसर्जन करण्यात आले. खोल समुद्रात लालबाच्या राजाचे विसर्जन झाले. विशेष म्हणजे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांची या विसर्जनाच्यावेळी खास उपस्थिती होतीMumbai Ganesh Immersion procession News and Update

Post a comment

 
Top