ऑटो डेस्क- मारुती सुझुकीने लिमिटेड एडिशन 'इग्निस'ला (Ignis) वेबसाइटवर लिस्ट केले आहे. इंडियन मार्केटमध्ये बेस्ट सेलिंग ठरलेल्या कारचे लिमिटेड एडिशन मारुती कंपनी लवकरच लॉन्च करणार आहे. ही कार डेल्टा व्हेरिएंटवर बेस्ड तसेच ते बेस सिग्नाचे टॉप मॉडेल असेल. कारची किंमत स्टँडर्ड इग्निसच्या डेल्टा व्हेरिएंटपेक्षा जास्त असेल. कारची किंमत 5.27 लाख रुपये असल्याची शक्यता आहे.
चला तर मग पाहुया कारचे फीचर्स...# इंजिनमध्ये कोणताही बदल नाही..
- लिमिटेड एडिशन मॉडेलच्या इंजिनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
- कारच्या कॉस्मॅटिक्समध्ये सर्वाधिक बदल करण्यात आला आहे. यात लेटेस्ट ग्राफिक्स दिले आहेत.
- कारमध्ये नवे रियर स्पॉयलर, डोअर क्लेडिंग, रिअर आणि फ्रंटसोबतच कारला चारही बाजुने फॉक्स स्किड प्लेट बसविली आहे.# ऑल-ब्लॅक लेदर थीमवर डेकोरेट
- कारला पूर्णपणे ऑल ब्लॅक थीमवर डेकोरेट करण्यात आले आहे. कारच्या इंटीरियरमध्ये ब्लॅक थीमवर बेस्ट लेदर वर्क करण्यात आले आहे.
- फ्रंट ड्युअल एअरबॅग्ज, एबीएस, ईबीडी, ISOFIX चाइल्ड सीट अँकर, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल ORVMs अॅण्ड इंडिकेटर्स, म्युझिक सिस्टिम ब्लूटूथ सपोर्ट सोबत, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल, मॅन्युअल एसी, हाईट अॅडजस्टेबल ड्रायव्हिंग सीट्स, टिल्ट अॅडजस्टेबल स्टीयरिंग, ऑल 4 पॉवर विंडो देण्यात आले आहे.
- कारच्या डायमेंशनमध्ये कोणताही बदल नाही.
- कारमध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. इंजिन 5 स्पीड ट्रान्समिशनसोबत ऑटोमॅटिक ट्रान्समिशन ऑप्शन देण्यात आले आहे.# आधी सारखेच स्टाइलिश इंटीरियर
- कारचे इंटीरियर खूप सुंदर आहे. ब्लॅक कलरसोबत ड्युअल-कॉम्बिनेशन देण्यात आले आहे.
- यात टॅब-लाइक टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम देण्यात आले आहे. म्यूझिकसोबत नेव्हिगेशनला सपोर्ट करते.
- कारच्या स्टीयरिंगमध्ये व्हॉल्यूम कंट्रोल, म्यूट, कॉल अटेंट, मोड सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.# जुन्या इग्निस एवढे मायलेज
- लिमिटेड एडिशन इग्निस ही पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही व्हेरिएंटमध्ये मिळेल. पेट्रोल व्हेरिएंट 20.89 Kmpl तर डिझेल 26.8 Kmpl मायलेज मिळेल.
- डिझेल मॉडेलमध्ये 1248cc आणि पेट्रोल मॉडेलमध्ये 1197cc चे इंजिन मिळेल. दोन्ही मॉडेलमध्ये 5 स्पीड गिअर बॉक्ससोबत AMT मॉडेल मिळेल.
- कारमध्ये 32 लिटरचे फ्यूल टॅंक आहे. टॉप मॉडेलला अलॉय व्हीलसोबत खरेदी करता येईल.
- फ्रंटमध्ये डिस्क आणि रिअरमध्ये ड्रम ब्रेकसोबत दोन्ही मॉडेलमध्ये इलेक्ट्रिक पॉवर स्टीयरिंगवर फोकस देण्यात आला आहे.-
-
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment