कोल्हापूर - शहर आणि जिल्ह्याला गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे शहराला पाणी पुरवठा करणारा ऐतिहासिक कळंबा तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे. हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी व आज पावसात भिजण्यासाठी हौशी कोल्हापूरकरांनी कळंबा तलावावर मोठी गर्दी केली आहे.

Post a Comment