(ही स्टोरी सोशल व्हायरल सिरीझवर आधारित आहे. या सिरीझच्या माध्यमातून आम्ही आपल्याला जगभरातील मोस्ट व्हायरल, शॉकिंग, इमोशनल आणि इंस्पायरिंग स्टोरी शेअर करत असतो. सोबतच, सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या खोट्या आणि सत्य संदर्भात माहिती देत आहोत.)
- न्यूयॉर्क - पती-पत्नीमध्ये सततचे वाद आणि मतभेदांवरून घटस्फोटाची प्रकरणे खूप आहेत. परंतु, येथे चक्क एका फोटोवरून एका दांपत्याचा घटस्फोट झाला आहे. यात पतीने पत्नीचा फोटो पाहताक्षणी तिच्यापासून फारक घेण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वीच फोटोमध्ये दिसणाऱ्या या महिलेचा पती कामानिमित्त शहराबाहेर होता. आपल्या पत्नीची आठवण येत असल्याने त्याने सहज तिला एक फोटो मागितला. बेडरुममध्ये बसलेल्या पत्नीने वेळीच एक फोटो काढला आणि आपल्या पतीला मेसेज करून पाठवला. याच फोटोने त्या दोघांचे आयुष्य नेहमीसाठी बदलले.
नेमके काय घडले..?
- पती हा फोटो पाहून इतका संतापला की त्याने फोटो मेसेजवर रिप्लाय करून घटस्फोट मागितला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हाच तो फोटो आहे जो पाहून पती जॉनने आपल्या पत्नीपासून फारकतीचा निर्णय घेतला. दुसऱ्या शहरात एका हॉटेलमध्ये थांबला असताना त्याने पत्नीला काळजी म्हणून सहज फोन केला होता. परंतु, वारंवार फोन करूनही पत्नीने काहीच प्रतिसाद दिला नाही.
- यानंतर जॉनला चिंता आणि संशय दोन्हीचा भास झाला. काही वेळातच पत्नीने कॉल बॅक केले तेव्हा जॉननी कुठे आहेस अशी विचारणा केली. पत्नीने आपण बेडरुममध्ये आहोत असे सांगितले. त्यावर तुझी आठवण येते एक फोटो तरी पाठव अशी विनंती केली. पत्नीने सुद्धा अगदी प्रेमाने आपला फोटो पतीला पाठवला. पत्नीचा हा फोटो पाहताच जॉन खुश झाला. परंतु, दुसऱ्याच क्षणी त्याला या फोटोमध्ये असे काही दिसले की तो प्रचंड संतापला.
नेमके काय दिसले या फोटोमध्ये?
पहिल्या नजरेत पाहिल्यास या फोटोमध्ये वेगळे काहीच दिसत नाही. जॉनची पत्नी बेडरुममध्ये सहज बसलेली दिसून येते. परंतु, लक्षपूर्वक पाहिल्यास कारण, स्पष्ट दिसेल की बेडरुममध्ये आणखी कुणीतरी आहे. आपला पती बाहेर असताना तिने दुसऱ्या एका पुरुषाला घरात, त्यातही बेडरुममध्ये बोलावले होते. त्यामुळेच, ती सुरुवातीला फोन सुद्धा उचलत नव्हती. आपल्या पत्नीवर चीटिंगचे आरोप लावून जॉनने घटस्फोट मागितला.मीडिया रिपोर्ट्सनुसार, हाच तो फोटो आहे जो पाहून पती जॉनने आपल्या पत्नीपासून फारकतीचा निर्णय घेतला.
Post a Comment