- मुंबई- श्री गणेशाचे गुरुवारी मुंबईतही जल्लोषात स्वागत करण्यात आले. सार्वजनिक मंडळासह हजारो नागरिकांच्या घरी गणेशाचे आगमन झाले. राजकारण्यांबरोबरच बॉलीवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटीजनीही आपल्या घरी गणेशाची स्थापना केली. लवकरच विक्री होणाऱ्या आरके स्टुडिओमध्येही दरवर्षीप्रमाणे गुरुवारी गणेशाची स्थापना झाली. आरके स्टुडिओचा हा अखेरचा गणेशोत्सव असल्याचे म्हटले जात आहे. प्रत्येकाने गणपतीकडे साकडे घातले असून यात पाऊस पडावा इथपासून स्वबळावर सत्ता यावी अशा मागण्यांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी गणेशाची स्थापना करण्यात आली. या वेळी मुख्यमंत्र्यांनी बळीराजा सुखी व्हावा, राज्यातील दुष्काळी भागात पाऊस पडावा आणि नागरिकांना सुख समाधान, चांगले आरोग्य मिळावे, अशी प्रार्थना गणरायाकडे केली. मुख्यमंत्र्यांनी पत्नी आणि मुलीसह श्री गणेशाची विधिवत प्रतिष्ठापना केली. या वेळी अधिकारी उपस्थित होते. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या घरीही दरवर्षीप्रमाणे गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. या वेळी मनाेहर जोशी यांनी राज्यात शिवसेनेची स्वबळावर सत्ता यावी असे साकडे गणरायाला घातले. -
-
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment