0
यावल- भुसावळ रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे दोन दिवसांत चार अपघात झाले आहेत. या अपघातात चार गंभीर जखमी अपघाताचा सापळा बनत चालला आहे. शुक्रवारी तीन दुचाकींच्या अपघातानंतर शनीवारी (दि.22) खड्डे चुकवतांना दोन ट्रक समोरा–समोर धडकल्या. त्यात दोन जण गंभीर जखमी झाले तर या अपघातात यावल- भुसावळ रस्ताच बंद पडला आहे.एसटी व खासगी वाहतुक तब्बल सहा तासांपासून भालोद-बामणोद व बोरावल–टाकरखेडामार्गे भुसावळ अशी वळवण्यात आली आहेत. रस्त्याच्या परिस्थितीमुळे उद्‍भवणाऱ्या अपघातामुळे नागरीकातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

एसटीबस व खासगी वाहने इतर मार्गाने वळवले...
या अपघातामुळे सकाळपासून यावल-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. तब्बल सहा तासांपासून ठप्प असलेल्या वाहतुकीमुळे काही वाहतूक व एसटी बसेस भालोद–बामणोदमार्गे तर काही बोरावल, टाकरखेडामार्गे भुसावळ अशी वळवण्यात आली होती.
नागरीकांमध्ये संताप...
भुसावळ रस्त्याची अत्यंत दयनिय अवस्था झाली असून रस्त्यावर सर्वत्र खड्डे पडले आहेत. तेव्हा हा रस्ता अपघाताचा सापळा बनत चालला आहे. रस्त्याच्या या अवस्थेबद्दल नागरीकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. रस्ता दुरूस्तीची मागणी करण्यात आली.Four Accident In Two Days on Yawal-bhusawal Highway


Post a comment

 
Top