0


  • साऊथम्पटन- सामनावीर माेईन अलीच्या (४/७१) शानदार गाेलंदाजीच्या बळावर यजमान इंग्लंड संघाने रविवारी चाैथ्या कसाेटीच्या चाैथ्याच दिवशी भारताचा पराभव केला. इंग्लंडने ६० धावांनी या कसाेटी विजय संपादन केला. विजयाच्या खडतर २४५ धावांच्या प्रत्युत्तरात भारतीय संघाने दुसऱ्या डावात अवघ्या १८४ धावांवर अापला गाशा गुंडाळला. भारताच्या विजयासाठी काेहली (५८) अाणि रहाणेने (५१) केलेली अर्धशतकी खेळी व्यर्थ ठरली.


    यासह इंग्लंडने पाच कसाेटी सामन्यांच्या मालिकेत ३-१ ने विजयी अाघाडी घेतली. अाता ७ सप्टेंबर, शुक्रवारपासून मालिकेतील पाचव्या कसाेटीला सुरुवात हाेईल. अाता या कसाेटीत बाजी मारून मालिकेचा शेवट गाेड करण्याचा टीम इंिडयाचा प्रयत्न असेल. याकडे टीमची नजर लागली अाहे.

    भारताकडून विजयासाठी रहाणे अाणि काेहलीने एकाकी झंुज दिली. मात्र, त्यांना अापल्या टीमला पराभव टाळता अाला नाही. माेईन अलीने शानदार गाेलंदाजी करताना चार विकेट घेतल्या. तसेच अँडरसन अाणि स्टाेक्सने प्रत्येकी दाेन गडी बाद केले. यासह त्यांनी भारताला राेखले.

    इंग्लंडचा तिसरा मालिका विजय
    इंग्लंडने अाता सात वर्षांत टीम इंडियावर सलग तिसऱ्या मालिका विजयाची नाेंद केली. यासह या टीमला मालिका विजयाची हॅट््ट्रिकही साजरी करता अाली. यापूर्वी इंग्लंडने २०११ अाणि २०१४ मध्ये भारतावर सलग दाेन मालिका विजय संपादन केले हाेते.

    काेहलीच्या कर्णधाराच्या भूमिकेत ४ हजार धावा 
    विराट काेहलीने कर्णधाराच्या भूमिकेत ४ हजार धावांचा पल्ला गाठला. त्याने ३९ सामन्यात ६५ डावांत १६ शतकांच्या अाधारे चार हजार धावा पूर्ण केल्या. असे करणारा ताे जगातील दहावा अाणि भारताचा पहिला कर्णधार ठरला. त्याने चाैथ्या कसाेटीच्या दुसऱ्या डावात ५८ धावांची खेळी केली. त्याचे हे १९ वे कसाेटी अर्धशतक ठरले.
    England's hat-trick of victory in test against India

Post a Comment

 
Top