0


  • नालासोपाऱ्यात वैभव राऊत याच्या घरावर छापा टाकून गावठी बाॅम्ब, जिलेटिन कांड्या, स्फाेटक पदार्थ व पावडर, इलेक्ट्राॅनिक डिटाेनेटर, नाॅन इलेक्ट्रिक डिटाेनेटर, सेफ्टी फ्यूज, सफेद रंगाची पावडर, दाेन बाटल्या (द्रवपदार्थ), बॅटऱ्या, कटर, हेक्सा ब्लेड, साेल्डरिंग मशीन, वायरिंगचे तुकडे, रिले स्विचेस, हँड ग्लाेव्हज असे गावठी बाॅम्ब बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले होते. मात्र, हे बॉम्ब आणि स्फोटकांचे साहित्य नालासाेपऱ्यात येण्यापूर्वी पुण्यात किरायाने राहत असलेल्या एका मुलाच्या घरी सुधन्वा गाेंधळेकर याने तीन पिशव्यांत ठेवले होते. तेथून ते नालासाेपाऱ्यात आणल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
    सुमारे दोन महिने स्फोटके खोलीत
    'माझे हार्डवेअरचे सामान खोलीत एका बाजूला राहू दे,' असे सांगत सुमारे दाेन महिने ही स्फोटके गोंधळेकर याने पुण्यात ठेवली होती. जुलै महिन्यात गाेंधळेकर, शरद कळसकर तसेच आणखी एक व्यक्ती स्फोटके व साहित्य नेतानाचे सीसीटीव्ही फुटेज एटीएसच्या हाती लागले आहे.
    पांगारकर देत होता निधी : जालना येथून अटक करण्यात अालेला माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकर हा काही प्रमाणात निधी पुरवत हाेता. तर, उर्वरित खर्च प्रशिक्षण देणारे लोक स्वत:च्या खिशातून करत असल्याची कबुली अाराेपींनी दिली अाहे. निधीची जमवाजमव वैभव राऊत करत असल्याचे चौकशीतून स्पष्ट होत आहे.
    काळेच्या डायरीत अनेकांची नावे
    बंगळुरू येथील पत्रकार गाैरी लंकेश हत्या प्रकरणात कर्नाटक एटीएसने चिंचवडच्या अमाेल काळे यास अटक केली. त्याच्याकडील डायरीत हिंदू चालीरीती व परंपरेला विराेध करणाऱ्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांची नावे अाहेत. काेणाला लक्ष्य करायचे हे कोअर कमिटी ठरवत असे. जितेंद्र अाव्हाड अाणि मुक्ता दाभाेलकर यांच्या मुंबईतील घरांची अाराेपींनी गेल्या वर्षी रेकी केली होती.
    चांगल्या कामास देवाचा पाठिंबा
    डाॅ.नरेंद्र दाभाेलकर यांच्या हत्येनंतर २२ पथकांनी राज्य तसेच परराज्यात कसून तपास केला. मात्र, ठोस काही हाती लागत नव्हते. सीबीअायने तपास करूनही तपासात विशेष प्रगती नव्हती. डाॅ. दाभाेलकर यांच्या हत्येला पाच वर्षे झाली आणि यादरम्यान काॅ. गाेविंद पानसरे, साहित्यिक एम.कलबुर्गी, पत्रकार गाैरी लंकेश यांच्या हत्या झाल्या. जे आरोपी पकडले त्यांनी वैचारिक मतभेदातून गुन्हे केल्याचे कबूल केले असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. हे आरोपी म्हणतात, 'देवावर अामचा विश्वास आहे. अाम्ही चांगले काम केल्यामुळे देवच अाम्हाला वाचवत आहे...'
    बिल्डर, भाईसाहेब आणि पाजी...
    वैभव राऊत टाेळीतील प्रत्येकाला एक टाेपण नाव हाेते. राऊतला 'बिल्डर', अमाेल काळेला 'भाईसाहब', श्रीकांत पांगारकरला 'पाजी', शरद कळसकरला 'छाेटू सिंग' आणि सुधन्वा गाेंधळेकरला 'पांडेजी ऊर्फ महेश पाटील' अशी टोपणनावे होती. काही जणांना मेकॅनिक, डंपर अशा टाेपणनावाने बाेलावले जात हाेते. अाराेपींनी हत्यांच्या वेळी सतत नवीन मोबाइल, सिमकार्डचा वापर केला.
    कोअर कमिटीचे हे होते सदस्य
    गाेंधळेकर, कळसकर व आणखी एक जण अशी तिघांची काेअर कमिटी राज्यभरातील धार्मिक संघटनांतील कट्टरवादी तरुणांचा शाेध घेऊन त्यांना शस्त्राचे प्रशिक्षण देत होते. कर्नाटक अाणि महाराष्ट्रातील जंगली किंवा दुर्गम भागात शस्त्र चालवणे, पेट्राेल बाॅम्ब तयार करणे, गावठी बाॅम्बची जुळवाजुळव करणे असे हे प्रशिक्षण होते. यात पुणे, अाैरंगाबाद, जालना, सांगली, बेळगाव या ठिकाणी शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देण्यात अाल्याची माहिती तपासात उघड झाली अाहे.
    explosives found in nalasopara comes from pune

Post a Comment

 
Top