- गुरदासपूर- लान्स नायक संदीप सिंह सोमवारी काश्मीरमध्ये चकमकीत शहीद झाले. मृत्युपूर्वी त्यांनी ३ अतिरेक्यांना टिपले. पंजाबच्या गुरदासपूरचे संदीप ४ पॅरा कमांडो पथकासोबत तंगधार सेक्टरमध्ये सर्च ऑपरेशनचे नेतृत्व करत होते. चकमकीत एक गोळी त्यांच्या कपाळावर लागली. कोटला गावात त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.मित्राला म्हटले होते, देश गर्व करेल असे काम करू
संदीप शहीद झाल्यानंतर मंगळवारी गुरदासपूरच्या कोटला खुर्द गावात प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होते. तिरंग्यातील त्यांच्या पार्थिवाला आई कुलविंदर कौर यांनी खांदा दिला. भारतीय माता इतकी कणखर आहे की, ती आपल्या मुलाला खांदा देऊन स्मशानापर्यंत नेऊ शकते, हा संदेश कुलविंदर यांनी दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या शेजारील राष्ट्राला दिला. त्या म्हणाल्या की, संदीपची आई असल्याचा मला अभिमान आहे. त्याच वेळी शहिदाचा ५ वर्षांचा मुलगा अभिनव पाणावलेल्या डोळ्यांनी तिरंग्यातील त्याच्या वडिलांच्या शरीराला न्याहाळत होता व आईचे डोळेही पुसत होता. संदीपची एकुलती एक बहीण खुशमीत कौरने भावाला राखी बांधून त्याला अखेरचा निरोप दिला तेव्हा संदीपच्या युनिटमधील मेजर मुकुल शर्मांनी त्यांच्या अश्रूंना वाट करून दिली. पाणावलेल्या डोळ्यांनी संदीप यांच्या पत्नी गुरप्रीत कौर म्हणाल्या की, “माझे पती शूरवीर सैनिक होते. त्यांनी पाठीवर नव्हे तर कपाळावर गोळी झेलली. त्यामुळे मी एकुलत्या एक मुलालाही सैन्यातच पाठवणार आहे.’ संदीप यांचा मित्र लवप्रीत सिंह म्हणाला की, संदीप बालपणापासूनच देशभक्ती बद्दल बोलायचा. मागील वेळी सुटीवर आला तेव्हा तो म्हणाला होता की, जीवनात एकदा असे काही काम करून दाखवीन की सर्वांना माझा अभिमान वाटेल आणि पूर्ण देश माझ्यावर गर्व करेल. तू मला टीव्ही चॅनलवर पाहशील. त्याने बोललेले प्रत्येक वाक्य आज खरे ठरले आहे.कोटला खुर्द गावात प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होते. तिरंग्यातील त्यांच्या पार्थिवाला आई कुलविंदर कौर यांनी खांदा दिला.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment