0
  •  अाेव्हल- लाेकेश राहुल ( १४९) अाणि ऋषभ पंत (११४) यांच्या द्विशतकी भागीदारीनंतरही टीम इंडियाला मंगळवारी यजमान इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसाेटीतील अापला पराभव टाळता अाला नाही. इंग्लंडने ११८ धावांनी भारतावर मात केली. यासह इंग्लंडने अापल्या सलामीवीर फलंदाज कुकला शानदार विजयाची भेट दिली. त्याची ही शेवटची कसाेटी हाेती. खडतर ४६४ धावांच्या प्रत्युत्तरात भारतीय संघाने दुसऱ्या डावात ३४५ धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे टीमला पराभवाचा सामना करावा लागला. लाेकेश व ऋषभने संघाच्या विजयासाठी शर्थीची झंुज दिली. मात्र, त्यांना टीमचा पराभव टाळता अाला नाही. ऋषभने यष्टीरक्षक म्हणुन चाैथ्या डावात सर्वाधिक धावांचा विक्रम केला. इंग्लंडने विजयासह पाच कसाेटी सामन्यांची मालिका ४-१ ने अापल्या नावे केली.


    भारताचा ११ वा पराभव : भारताचा इंग्लंडच्या खेळपट्टीवरचा हा ११ वा पराभव झाला. या ठिकाणी भारताने २०११ मध्ये ०-४ अाणि २०१४ मध्ये १-३ ने पराभवाचा सामना केला हाेता.

    राहुलसाेबत द्विशतकी भागीदारी; पंत एकमेव 
    लाेकेश राहुल अाणि ऋषभ पंतने संयमी खेळी केली. त्यांनी सहाव्या गड्यासाठी २०४ धावांची भागीदारी रचली. राहुलने २२४ चेंडूंत २० चाैकार व १ षटकारासह १४९ धावा काढल्या. यष्टिरक्षकाच्या भूमिकेत ऋषभ पंतने चाैथ्या डावात सर्वाधिक धावांची नाेंद केली. त्याने १४६ चेंडूंत १५ चाैकार व ४ षटकारांसह ११४ धावा काढल्या. असे करणारा ताे भारताचा एकमेव यष्टिरक्षक ठरला.
    India's 11th defeat in seven years in England

Post a Comment

 
Top