0


  • PM's meeting on fuel and deteriorating rupee    नवी दिल्ली- देशाच्या अार्थिक स्थितीचा अाढावा घेण्यासाठी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी महत्त्वाची बैठक घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रूड अाॅइलचे वाढते दर अाणि रुपयाच्या घसरणीबराेबरच अार्थिक विकास दर वाढवण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली.
    अर्थमंत्री अरुण जेटली अाणि रिझर्व्ह बंॅकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल या वेळी उपस्थित हाेते. शनिवारी पुन्हा बैठकीत खल हाेऊन काही महत्त्वपूर्ण निर्णय हाेण्याची शक्यता अाहे. सूत्रांच्या माहितीनुसार, रुपयाला सावरण्यासाठी सरकार व्याजदर वाढवू शकते. परदेशी चलनाची अावक वाढवण्यासाठी निर्यातीलाही चालना देऊ
  •   
  • शकते. शनिवारी हाेणाऱ्या बैठकीत पुढील निवडणूक वर्षात महसुलीत हाेणाऱ्या संभाव्य घटीचाही अाढावा घेतला जाईल.

Post a comment

 
Top