पुणे- डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अमोल काळे याची शुक्रवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. ए. सय्यद यांनी हा आदेश दिला. कोठडीत असताना कोल्हापूर एसआयटीने मारहाण केल्याची तक्रार काळे याने न्यायालयाकडे केली. दरम्यान, अमोल याला गौरी लंकेश प्रकरणात बंगळुरू कारागृहात रवाना करण्यात आले.
दुसरा अाराेपी सचिन अणदुरे याच्याकडून जप्त करण्यात आलेले पिस्तूल अमोलनेच पुरवले असल्याची माहिती सीबीआयने सादर केलेल्या रिमांड रिपोर्टवरून न्यायालयात यापूर्वी स्पष्ट झाले आहे. पत्रकार गौरी लंकेश हत्येतील प्रमुख आरोपी काळेचा सीबीआयच्या पथकाने बंगळुरू येथील तुरुंगातून ताबा घेतला होता. तो डॉ. दाभोलकर हत्येतही मास्टरमाइंड असावा, असा सीबीआयला संशय आहे. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर संशयित शरद कळसकर आणि अणदुरे यांनी ज्या दुचाकीवरून पळ काढला तिची व्यवस्था काळेने केली होती, अशी माहिती उघड झाली. त्यामुळे त्याला सीबीआयने ताब्यात घेतले आहे.
Post a Comment