0
 • Thirteen matches to be played in 14 daysयेत्या शनिवारपासून अाशिया चषक क्रिकेट स्पर्धेला सुुरुवात हाेत अाहे. या स्पर्धेत अायसीसीच्या १२ पैकी पाचसदस्यीय संघ अापले काैशल्य पणास लावतात. अाता नव्याने हाँगकाँग संघाला यासाठीची संधी मिळाली अाहे. यूएईमधील या स्पर्धेत यंदा १४ िदवसांमध्ये १३ सामन्यांचा थरार रंगणार अाहे. यादरम्यान भारत अाणि पाकिस्तान या दाेन कट्टर प्रतिस्पर्धी संघांचा सामनाही रंगणार अाहे. हे दाेन्ही संघ बुधवारी समाेरासमाेर असतील. या दाेन्ही संघांमध्ये तीन सामने हाेण्याची शक्यता अाहे. त्यामुळे चाहत्यांनी या सामन्याकडेच नजर लागली अाहे. हेच या स्पर्धेचे खास अाकर्षण अाहे.


  जगभरातील सध्याच्या एक अब्ज चाहत्यांमधील ९० टक्के चाहते हे एकट्या अाशियातील अाहेत. तसेच अायसीसीच्या एकूण कमाईमध्ये ८५ टक्के महसूल हा अाशिया खंडातून दिला जाताे. यावरून क्रिकेटमधील अाशियाच्या शक्तीचा अंदाज याच गाेष्टीने सहजरीत्या लागताे. याशिवाय एकटा भारतीय संघ हा ७५ टक्के महसूल मिळवून देताे. याशिवाय विजेत्यांच्या यादीतही भारताचा दबदबा कायम राहिला अाहे. टीम इंडियाने अातापर्यंत सहा वेळा अाशिया चषक पटकावला.

  भारताला सातव्या किताबाची संधी
  भारतीय संघ अाताा सातव्यांदा अाशिया चषक जिंकण्यासाठी सज्ज झाला अाहे. काेहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा राेहित शर्माकडे साेपवण्यात अाली. त्यामुळे राेहित अाता अापल्या नेतृत्वात टीमला हा किताब िमळवून देण्यासाठी प्रयत्नशील असेल. यादरम्यान त्याला माजी कर्णधार धाेनीच्याही मार्गदर्शनाची खास साथ मिळेल.

  नाेट : २०१६ च्या स्पर्धेचे अायाेजन टी-२० फाॅरमॅटमध्ये हाेते. 
  - भारताने सर्वाधिक ६ वेळा अाशिया कप पटकावला. 
  - श्रीलंका संघ पाच वेळा किताबाचा मानकरी 
  - पाकिस्तान संघाने दाेन वेळा स्पर्धेचा किताब पटकावला अाहे

  वर्ल्डकपमुळे वनडेचे हाेणार अायाेजन; २०१९ मध्ये स्पर्धा 
  गत अाशिया चषकाचे (२०१६) अायाेजन हे टी-२० च्या फाॅरमॅटमध्ये करण्यात अाले हाेते. ही अाशिया चषक स्पर्धा टी-२० वर्ल्डकपपूर्वी झाली हाेती. त्यामुळे त्याचा फाॅरमॅटही ताेच ठेवण्यात अाला. अाता २०१९ मध्ये वनडेचा वर्ल्डकप हाेणार अाहे. याच्या तयारीसाठी हाच वनडेचा फाॅरमॅट ठेवण्यात अाला. यातून अाता हा अाशिया चषक राेटेशन पद्धतीने हाेताना दिसेल.

  शनिवारपासून यूएईमध्ये अाशिया चषकाला सुरुवात हाेत अाहे. या स्पर्धेसाठी गुरुवारी सहा वेळचा किताब विजेता भारतीय संघ रवाना झाला. दरम्यान, कुलदीप यादवने सर्वांचा एक फाेटाे शेअर केला.

  पाकच्या सहभागामुळे यूएईला अधिकार 
  यंदा अाशिया कपच्या यजमानपदची संधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे हाेती. मात्र, पाकच्या सहभागामुळेच बीसीसीअायने हे सर्व अधिकार यूएईला दिले. कारण पाक संघाचा भारत दाैरा शक्य नसता. यात अनेक अडचणी निर्माण झाल्या असत्या. तसेच शातंता भंग पावली असती, अशी कारणे अाहे.

  काेहलीच्या नावे सर्वाेत्तम स्काेअरचा विक्रम पाकविरुद्ध २०१२ मध्ये १८३ धावा 
  स्पर्धेतील सर्वाेत्तम स्काेअरचा विक्रम भारताच्या विराट काेहलीच्या नावे अाहे. त्याने २०१२ मध्ये पाकिस्तानविरुद्ध १८३ धावांची खेळी केली हाेती. एकाच स्पर्धेत सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम श्रीलंकेच्या जयसूर्याच्या नावे अाहे. त्याने २००८ मध्ये ३७८ धावा काढल्या हाेत्या. याशिवाय त्याच्या नावे सर्वाधिक सहा शतकांचीही नाेंद अाहेे. स्पर्धेच्या इतिहासात जयसूर्या १२२० धावांसह अाणि मुरलीधरन ३० विकेटसह अाजही नंबर वन अाहेत. भारताकडून सर्वाधिक धावा सचिनने (९७१) काढल्या अाहेत.

  स्पर्धेचे वेळापत्रक : शनिवारपासून अाशिया चषक; भारत-पाक सामना १९ सप्टेंबर राेजी
  अ गट : भारत, पाकिस्तान, हाँगकाँग 
  ब गट : श्रीलंका, बांगलादेश अाणि अफगाणिस्तान

  १५ सप्टेंबर बांगलादेश वि. श्रीलंका 
  १६ सप्टेंबर पाकिस्तान वि. हाँगकाँग 
  १७ सप्टेंबर अफगाणिस्तान वि. श्रीलंका 
  १८ सप्टेंबर भारत वि. हाँगकाँग 
  १९ सप्टेंबर भारत वि. पाकिस्तान 
  २० सप्टेंबर अफगाणिस्तान वि. बांगलादेश 
  २१ सप्टेंबर अ गट विजेता वि. ब गट उपविजेता 
  २१ सप्टेंबर ब गट विजेता वि. अ गट उपविजेता 
  २३ सप्टेंबर अ गट विजेता वि. अ गट उपविजेता 
  २३ सप्टेंबर ब गट विजेता वि. ब गट उपविजेता 
  २५ सप्टेंबर अ गट विजेता वि. ब गट विजेता 
  २६ सप्टेंबर अ गट उपविजेता वि. ब गट उपविजेता

  २८ सप्टेंबर फायनल 
  नोट: भाात अाणि पाकिस्तान हे दाेन्ही संघ अापल्या अ गटात अव्वल दाेन स्थानावर कायम राहणार असल्याचे जवळपास निश्चितच अाहे. म्हणजे सुपर-४ चा सामना २३ सप्टेंबर राेजी यांच्यात हाेईल. त्यानंतरही यांच्यात लढत हाेण्याची शक्यता अाहे.

  श्रीलंकेच्या नावे सर्वाधिक ३५ विजय; भारताचे ३१ विजय 
  स्पर्धेत सर्वाधिक ३५ सामने जिंकण्याचा विक्रम श्रीलंका टीमच्या नावे अाहे. त्यापाठाेपाठ भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर अाहे. भारताने ३१ सामने जिंकले. तसेच तिसऱ्या स्थानावर असलेल्या पाकच्या नावे २६ विजयाची नाेंद अाहे. टीमकडून सर्वाधिक स्काेअरची नाेंद पाकच्या नावे अाहे. या टीमने २०१० मध्ये बांगलादेशविरुद्ध ३८५ धावा काढल्या हाेत्या.

Post a Comment

 
Top