0
अबुधाबी- बुधवारी बांगलादेशने जबरदस्त प्रदर्शन करत पाकिस्तानवर ३७ धावांनी मात करत आशिया कपच्या फायनलमध्ये धडक मारली. अाता २८ सप्टेंबर रोजी भारतासमोर बांगलादेशचे आव्हान असेल. मुशफिकुर रहीमच्या (९९) अर्धशतकाच्या बळावर बांगलादेशने ४८.५ षटकांत सर्वबाद २४० धावा काढल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ ५० षटकांत ९ बाद २०२ धावा करू शकला.
  • एशिया कपच्या इतिहासात ९९ धावांवर बाद होणारा रहीम पहिला खेळाडू बनला आहे. रहीम आणि मो. मिथुनने (६०) चौथ्या गड्यासाठी १४४ धावांची भागीदारी रचली. पाकिस्तानकडून जुनैद खानने ४ गडी टिपले.

    प्रत्युत्तरात पाकिस्तानकडून इमाम उल हकचे (८३) अर्धशतक व्यर्थ ठरले. शोएब मलिक (३०), आसिफ अली (३१), शाहिन आफ्रिदीचे (१४*) प्रयत्न अपुरे ठरले. मुस्तफिजुरने ४ बळी घेतले.

    एशिया कपच्या इतिहासात ९९ धावांवर बाद होणारा रहीम पहिला खेळाडू बनला आहे

    • Ashia cup final in between India-Bangladesh

Post a comment

 
Top