0
  • एंटरटेन्मेंट डेस्कः अंबानी कुटुंबात पुन्हा एकदा मोठे सेलिब्रेशन होत आहे. शुक्रवारी मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी आणि अजय पीरामल यांचा मुलगा आनंद पीरामल यांचा साखरपुडा आहे. इटलीतील लेक कोमो येथे दोघांचा साखरपुडा होणार आहे. 21 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर याकाळात हे सेलिब्रेशन चालणार आहे. याचवर्षी मे महिन्यात आनंद पीरामल यांनी महाबळेश्वरच्या एका मंदिरात ईशा अंबानीला प्रपोज केले होते. मे महिन्यात एका प्रायव्हेट पार्टीत याचे सेलिब्रेशन झाले होते. याचवर्षी डिसेंबर महिन्यात ईशा आणि आनंद यांचे लग्न होणार आहे. साखरपुड्यापूर्वी मुकेश अंबानींच्या घरी ईशा आणि आनंद यांची प्री एंगेज्मेंट पार्टी झाली होती. या पार्टीचे अनेक व्हिडिओत सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अशाच एका व्हायरल झालेल्या व्हिडिओत नीता अंबानी डान्स करताना दिसल्या होत्या.

Post a Comment

 
Top