0
 • दुबई- शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारताने तीन गड्यांनी विजय मिळवला. तब्बल सातव्यांदा भारताने आशिया चषकावर नाव कोरले. बांगलादेशाने भारताला विजयासाठी २२३ धावांचे लक्ष्य दिले होते. शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी सहा धावांची गरज होती. पहिल्या व दुसऱ्या चेंडूवर प्रत्येकी एक-एक धाव निघाली. तिसऱ्या चेंडूवर कुलदीप यादवने २ धावा काढल्या. चौथा चेंडू निर्धाव गेला. पाचव्या चेंडूवर एक धाव घेत धावसंख्या बराेबरीत आली. जायबंदी असूनही मैदानावर उतरलेल्या केदार जाधवचा शेवटच्या चेंडूवर फटका हुकला. मात्र चेंडू पायाला लागून लेगबायच्या रूपात एक धाव मिळाली व भारताने आशिया चषक पटकावला. रोहित शर्माने ४८ तर केदार जाधवने नाबाद २३ धावा केल्या. भारताचा फायनलमध्ये बांगलादेशविरुद्धचा हा सलग दुसरा विजय ठरला.


  कुलदीप यादव (३/४५) अाणि केदार जाधव (२/४१) यांच्या धारदार गाेलंदाजीमुळे दमछाक झालेल्या बांगलादेशचा ४८.३ षटकांत खुर्दा उडाला. प्रत्युत्तरात भारताने ३ गड्यांनी सामना जिंकला. दरम्यान धाेनीला अांतरराष्ट्रीय सामन्यात यष्टीमागे ८०० बळींचा पल्लाही गाठता अाला. यातून ताे सर्वाेत्कृष्ट विकेटकिपर ठरला.

  गतचॅम्पियन भारतीय संघाने नाणेफेक जिंकली अाणि कर्णधार राेहित शर्माने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. दरम्यान, बांगलादेशच्या सलामीवीर लिटन दास अाणि मेहंदीने दमदार सुरुवात करताना टीमला शतकी भागीदारीची सलामी दिली. यासह त्यांनी टीम इंडियाच्या कर्णधार राेहितचा निर्णय साफ चुकीचा ठरवला. त्यांनी पहिल्या विकेटसाठी १२० धावांची माेठी भागीदारी रचली.

  केदार जाधवने उघडले खाते
  बांगलादेशने चांगली सुरुवात केली. त्यामुळे बिनबाद १२० धावांमुळे टीमची मजबूत स्थितीकडे अागेकूच हाेती. दरम्यान, केदार जाधवला गाेलंदाजीची संधी देण्यात अाली. याच संधीचे साेने करताना त्याने विकेटचे खाते उघडले. त्याने सलामीवीर मेहंदीला बाद करून भारतीय संघाला महत्त्वाचा बळी मिळवून दिला. याशिवाय त्याने तुफानी खेळी करताना शतकी भागीदारी रचणारी ही जाेडी फाेडली. त्यामुळे मेहंदीला ३२ धावांची खेळी करून पॅव्हेलियन गाठावे लागले.

  बांगलादेशविरुद्ध सलग दुसरा विजय 
  सात वेळच्या चॅम्पियन टीम इंडियाने अाता अाशिया चषकात बांगलादेशविरुद्ध सलग दुसरा विजय नाेंदवला. भारताने तिसऱ्यांदा अाशिया चषकाच्या फायनलमध्ये बांगलादेशचा पराभव केला. यापूर्वी भारताने २०१६ च्या अाशिया चषकातील अंतिम सामन्यातही बांगलादेशवर मात केली हाेती. यासह भारताने अाता दुसऱ्यांदा बांगलादेशचा किताबाचा प्रयत्न हाणून पाडला.
  कुलदीपचे तीन बळी 
  भारताकडून युवा गाेेलंदाज कुलदीप यादव चमकला. त्याने शानदार गाेलंदाजी करताना तीन विकेट घेतल्या. त्याने १० षटकांमध्ये ४५ धावा देताना तीन बळी घेतले. यादरम्यान त्याने शतकवीर लिटन दास (१२१), महमुद्दुल्लाह (४) अाणि कर्णधार मुर्तझाला (७) बाद केले.

  दाेन बळीने धाेनीने गाठला विक्रमाचा यशस्वी पल्ला! 
  धाेनीने फायनलमध्ये यष्टीमागे दाेन बळी घेतले. यासह त्याने अशा प्रकारच्या ८०० बळींचा पल्ला यशस्वीपणे गाठला. यामध्ये वनडेत ३०६ झेल, ११३ यष्टिचीत,कसाेटीत २५६ झेल,३९ यष्टिचीत अाणि टी-२० त ५४ झेल व ३३ यष्टिचीत अाहे.

  फायनलमध्ये शतक ठाेकणारा लिटन पाचवा 
  सलामीवीर लिटन दासने एकाकी झुंज देताना शानदार शतक झळकावले. त्याने ११७ चेंडूंमध्ये १२१ धावांची खेेळी केली. यामध्ये १२ चाैकार अाणि २ षटकारांचा समावेश अाहे. यासह त्याने टीमच्या धावसंख्येला गती देण्याचा प्रयत्न केला. यासह ताे फायनलमध्ये शतक झळकावणारा जगातील पाचवा फलंदाज ठरला.

  गतचॅम्पियन भारतीय संघाने नाणेफेक जिंकली अाणि कर्णधार राेहित शर्माने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

  • asia cup india vs bangladesh final oneday cricket match live news and updat

Post a comment

 
Top