0


 • नवी दिल्ली- देशात मान्सूनच्या निरोपाची उलटगणती १३ दिवसांनंतर सुरू होईल. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार देशभरात शुक्रवारपर्यंत ९३ टक्के पाऊस झाला आहे. अर्थात ७ टक्के कमी. या पावसाचे खास वैशिष्ट्य पाहायला मिळाले. यंदाच्या ऋतूत झालेले सर्व पाऊस ९९ तासांत झाले. अर्थात नुसते धो-धो. त्यात निम्मा पाऊस तर ३३ तासांत झाला. म्हणजे पाऊस रिमझिम नव्हता. त्यामुळेच आसाम, केरळ, महाराष्ट्रासह १० राज्यांत पूरसदृश स्थिती बनली. पावसासाठी आेळखले जाणारे ईशान्येकडील सिक्कीम वगळता राज्यांत १२ ते ३६ टक्के पाऊस झाला. गतवर्षी २७ सप्टेंबरला पावसाने निरोप घेतला होता. सध्या मान्सूनचे केंद्र छत्तीसगडमध्ये आहे.


  ओडिशा : ५ जिल्ह्यांत एक दिवसात १० सेंमीहून जास्त 
  आेडिशातील पाच जिल्हे पुराने बेहाल आहेत. एकाच दिवसात तेथे १० सेंमीहून जास्त पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस केंद्रपाडामध्ये २७.१ सेंमी, भद्रक-१०.६ सेंमी पावसाची नोंद झाली. पावसामुळे या जिल्ह्यांत १० जण जखमी झाले. सात हजारांवर लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात आले आहे.

  उत्तराखंड : चमोलीत ढगफुटी, लोक अडकले
  उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात सगोला बगड भागात गुरुवारी रात्री ढगफुटीची घटना घडली. त्यानंतर लोकांनी जीव मुठीत घेऊन परिसर सोडला. डोंगरावरून आलेले ढिगाऱ्याखाली अनेक गोशाळा व इतर जनावरे गाडली गेली. ढगफुटीमुळे कृषीमालाची मोठी हानी झाल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.

  देशाचे सध्याचे चित्र....
  - २४ राज्यांत आतापर्यंत सरासरीहून कमी, मणिपूरमध्ये झाली घट 
  - ५३ टक्के कमी पाऊस आतापर्यंत मणिपूरमध्ये झाला 
  ४१ टक्के कमी पाऊस मेघालयात, ३६ टक्के पावसाची अरुणाचलमध्ये नोंद.

  मध्य प्रदेश, राजस्थान व गुजरातही सरासरीहून कमी
  - मध्य प्रदेशात आतापर्यंत सरासरी ५ टक्के कमी, राजस्थान-११ टक्के, गुजरातेत २२ टक्के कमी पाऊस झाला. 
  - पंजाबमध्ये १६ टक्के, हरियाणा-२० टक्के, बिहार-१६ टक्के कमी पाऊस झाला. 
  - उत्तर प्रदेश, चंदिगड व महाराष्ट्रात सरासरी पाऊस झाला. आेडिशात १७ टक्के तर छत्तीसगडमध्ये ३ टक्के जास्त पाऊस झाला.
  Monsoon status revived before end

Post a Comment

 
Top