- नवी दिल्ली- भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या सीमेवर इलेक्ट्रॉनिक भिंत उभी केली आहे. ही भिंत पाकिस्तानातून होणाऱ्या घुसखोरीच्या प्रयत्नांना हाणून पाडणार आहे. जम्मूमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेच्या दोन बाजूंनी हे कुंपण लावण्यात आले आहे. देशात अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग आहे.सैन्याचे एक अधिकारी म्हणाले, ही उच्च तंत्रज्ञानाच्या साह्याने केली जाणारी पहिलीच सुरक्षा निगराणी यंत्रणा ठरणार आहे. जमीन, भूयारे, पाणी व आकाशातून होणाऱ्या घुसखोरीच्या प्रयत्नांना हाणून पाडण्याची क्षमता या यंत्रणेत आहे. एकाचवेळी अशा सर्व दिशांतील हालचालींना टिपले जाऊ शकते. या इलेक्ट्रिक कुंपणाला शत्रू पाहू शकणार नाही. त्यामुळे सीमा सुरक्षा दलास (बीएसएफ) घुसखोराची आेळख पटवणे कठीण होणार नाही. गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते सोमवारी या यंत्रणेच्या प्रकल्पाची सुरूवात होणार आहे. एका प्रकल्पांतर्गत ५.५ किलो मीटरच्या सीमेवर निगराणी करणे शक्य आहे. या व्यवस्थेला कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटिग्रेटेड बॉर्डर मॅनेजमेंट सिस्टिम ( सीआयबीएमएस) असे नाव देण्यात आले आहे.
एक किलोमीटर भिंत उभारण्यासाठी किमान दीड कोटी रुपये खर्च
२९०० किमीच्या सीमेवर यंत्रणा लावण्याचे उद्दिष्ट. एका किमीसाठी एक कोटी रुपये खर्च अपेक्षित. १३० निश्चित धोक्याच्या सीमेवर लावले जाणार.६ किमी अंतरावर असेल नियंत्रण कक्ष. दोन वर्षांत योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट. ५० खासगी कंपन्यांचा प्रकल्पात समावेश शक्य
कशी? ३ स्तरीय प्रणालीने सीमेवर निगराणी करेल सीआयबीएमएस
पाकिस्तानकडून रात्रीच्या वेली डोंगराळ-दुर्गम भागातून घुसखोरी केली जाते. सीआयबीएमएस तीन तंत्रज्ञानावर आधारित आहे. इन्फ्रा रेड लेझर बेस्ड इंट्रूजन डिटेक्टर, सोनर सिस्टिम व एअरोस्टेट टेक्नॉलॉजी सिस्टिमने तयार झाले आहे. इन्फ्रा-रेड-लेझर बेस्ड इंट्रूजन डिटेक्टर जमीन, नदीच्या परिसरात सक्रिय राहूून घुसखोरांना शोधून काढेल.
काय? तैनातीच्या दुर्गम भागात उपयोगी येणारे हे तंत्रज्ञान आहे ?
सीआयबीएमएसचे डिझाईन दुर्गम भागांतील तैनातींचा विचार करूनच तयार करण्यात आले आहे, असा दावा सैन्य विभागाच्या वतीने करण्यात आला आहे. सैन्याची तैनाती शक्य नसलेल्या ठिकाणी सीआयबीएमएसची भिंत उभारली जाणार आहे.का ? कन्ट्रोल सर्व्हिलान्सने लवकर मिळेल डेटा, कारवाईही
अनेकदा घुसखोर भूयार खोदून सीमेत प्रवेश करतात. सीआयबीएमएसमध्ये असलेल्या अंडरग्राउंड सेन्सर्समुळे या मार्गे घुसखोरी करू पाहणाऱ्यांना पकडणे शक्य होईल. सुरक्षा दलास कन्ट्रोल सिस्टिम सर्व्हिलांस डिव्हाइसच्या मदतीने त्याबद्दलची माहिती तत्काळ मिळेल. त्यानंतर जवान सतर्क होऊन तेथे कारवाई करू शकतील.
कोठे ? भारत-बांगलादेशच्या २९०० किमी सीमेवरही भिंत
भारताने सीआयबीएमएस हे तंत्रज्ञान इस्रायलच्या मदतीने तयार केले आहे. पुढे त्याचा वापर बांगलादेश सीमेवर लावले जाईल. भारत व बांगलादेशाच्या २९०० किमींच्या सीमेवरून घुसखोरी रोखण्यासाठी त्याचा वापर केला जाणार आहे. अमेरिकेकडे अशा प्रकारची यंत्रणा आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment