0
 • Team India will play first time against Bangladesh in finalदुबई- टीम इंडिया अाता अाठव्यांदा चॅम्पियन हाेण्याच्या इराद्याने मैदानावर उतरणार अाहे. भारत अाणि बांगलादेश यांच्यात शुक्रवारी अाशिया चषकासाठी फायनल मुकाबला हाेईल. वनडे क्रिकेटमध्ये भारतीय संघ प्रथमच कोणत्याही मल्टीिनॅशनल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बांगलादेशविरुद्ध खेळणार अाहे. बांगलादेश संघाने पहिल्यांदाच वनडे फाॅरमॅटच्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. त्यामुळे अाता या संघाला बलाढ्य अाणि सात वेळच्या चॅम्पियन भारताच्या तगड्या अाव्हानाचा सामना करावा लागेल. सलगच्या विजयाने भारताचा संघ जबरदस्त फाॅर्मात अाहे. तसेच पाकिस्तानचा पराभव करून बांगलादेशने फायनल गाठली. त्यामुळे या टीमचा अात्मविश्वास द्विगुणीत झाला. यातून या टीमचा किताबाचा दावाही काहीसा मजबूत मानला जाताे.


  अफगाणिस्तानविरुद्ध गत सामन्यात कर्णधार राेहित शर्मासह पाच अव्वल खेळाडूंना विश्रांती देण्यात अाली हाेती. यामध्ये धवन, भुवनेश्वर कुमार, यजुवेंद्र चहल अाणि बुमराहचा समावेश हाेता. अाता हे पाचही खेळाडू अाज बांगलादेशविरुद्ध हाेणाऱ्या फायनलसाठी भारतीय संघात असतील. पाकविरुद्ध खेळलेला भारताचा संघ अाता फायनलसाठी मैदानावर उतरण्याची शक्यता अाहे.

  टी-२० मध्ये विजेता 
  भारताने टी-२० च्या फाॅरमॅटमध्ये बांगलादेशविरुद्ध दाेन वेळा फायनल खेळली हाेती. यादरम्यानच्या दाेन्ही संघांमध्ये भारतीय संघ वरचढ ठरला. त्यामुळे हे दाेन्ही सामने बांगलादेशला गमावावे लागले. यामध्ये २०१६ च्या अाशिया कप अाणि निदाहास ट्राॅफीचा समावेश अाहे. यातील हे दाेन्ही अंतिम सामने भारताने माेठ्या फरकाने जिंकले हाेते.

  भारताची नजर सातव्या किताबावर 
  भारताने अातापर्यंत सहा वेळा किताब पटकावला अाहे. यामधील ५ किताब हे वनडे व एक किताब टी-२० फाॅरमॅटमध्ये जिंकला. भारतीय संघ १९८४, १९८८, १९९०, १९९५, २०१० अाणि २०१६ मध्ये या स्पर्धेचा विजेता ठरला.

  धवनला सर्वाधिक धावांच्या विक्रमाची संधी 
  टीम इंडियाचा स्फाेटक सलामीवीर शिखर धवन अाता अाशिया चषकात सर्वाधिक धावांच्या विक्रमापासून काही अंतरावर अाहे. त्याने अातापर्यंत चार सामन्यांत दाेन शतकांच्या अाधारे ३२७ धावा काढल्या अाहेत. अाता ताे एकाच अाशिया चषकात सर्वाधिक धावांचा श्रीलंकेच्या माजी क्रिकेटपटू जयसूर्याचा विक्रम ब्रेक करू शकेल. जयसूर्याच्या नावे २००८ च्या अाशिया चषकात विक्रमी ३७८ धावांची नाेंद अाहे. त्याने पाच सामन्यांत हा विक्रम रचला. यामध्ये बांगलादेशचा रहीम (२९७) अाणि भारताचा राेहित (२६९) हेदेखील सहभागी अाहेत.

  संभाव्य संघ 
  भारत 
  : राेहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, अंबाती रायडू, दिनेश कार्तिक, महेंद्र सिंग धाेनी, केदार जाधव, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, कुलदीप , चहल, बुमराह.
  बांगलादेश : मुर्तझा (कर्णधार), लिटन दास, साैम्य सरकार, माेमिनुल हक, मुशफिकूर रहिम, माे. मिथून, इमरूल कायेस, मेंहदी हसन, रुबेल हुसैन, मुस्तफिजूर रहमान

Post a comment

 
Top