0
 • टेनिसीः ही काही वर्षांपूर्वी अमेरिकेत घडलेली घटना आहे. सकाळी झोपेतून उठल्यानंतर एक महिला आणि तिच्या मुलीची अचानक तब्येत बिघडली. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारानंतर दोघींचे प्राण वाचले. पण काही दिवसांनी जेव्हा या घटनेमागचे सत्य समोर आले, ते हैराण करणारे होते. मेडिकल चाचण्यांनंतर उघड झाले की, ज्या टुथपेस्टने या मायलेकीने दात घासले होते, त्यात विष होते आणि हे टुथपेस्टमध्ये हे विष या महिलेच्या नव-यानेच टाकले होते. तिच्या नव-यानेच त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता.

  टूथपेस्टमुळे गेला असता जीव...
  - ही स्टोरी टेनिसीच्या कोलिविर्ली शहरात राहणा-या स्टेसी वॉर्टमनची आहे. डिसेंबर 2014च्या एका सकाळी स्टेसी नेहमीप्रमाणे ब्रश करत होती. पण ब्रश करत असताना तिच्या तोंडात जळजळ सुरु झाली आणि भयंकर डोकेदुखी सुरु झाली. तब्येत खालावल्याने तिला नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. उपचारानंतर तिचे प्राण वाचले. पण उपचारांना उशीर झाला असता, तर कदाचित स्टेसी आज या जगात नसती.
  - स्टेसीच्या पालकांना टुथपेस्टमध्येच काहीतरी गडबड असल्याचा संशय आला. त्यामुळेच मुलगी आणि नातीची तब्येत बिघडली असावी, असे त्यांना वाटले. म्हणून त्यांनी ती टुथपेस्ट सांभाळून ठेवली. त्यावेळी त्यांना टुथपेस्टमध्ये विष असल्याचे ठाऊक नव्हते.
  - घटनेच्या काही दिवसांनी म्हणजे जानेवारी 2015 मध्ये पोलिस स्टेसीच्या घरी येतात आणि त्यांनी तिच्या नवरा फ्रेडवर संशय व्यक्त केला. कारण त्यांना अनेक प्रकारच्या विषासोबत त्याचा एक फोटो मिळाला होता.
  - स्टेसी तिच्यासोबत असलेली घटना पोलिसांना सांगते. त्यानंतर पोलिस ती टुथपेस्ट तपासणीसाठी पाठवतात, त्यात विष असल्याचे निष्पण्ण होते. टुथपेस्टमध्ये विषारी झाडापासून तयार झालेले एंकोनिटम नावाचे विष आढळते.
  - विषारी टुथपेस्टमुळेच स्टेसीची तब्येत बिघडल्याचे उघड होते. पण टुथपेस्टमध्ये फ्रेडने स्वतः विष मिसळले की यासाठी त्याने कुणाची मदत घेतली, हे समोर येत नाही.
  स्टेसीने घेतला होता घटस्फोट.. 
  - स्टेसी आणि फ्रेड ऑस्टन वॉर्टमन (39) ची भेट युनिव्हर्सिटीत शिकत असताना झाली होती. फ्रेड वकील झाला, तर स्टेसी शिक्षिका झाली.
  - 2000 मध्ये लग्न करुन हे दोघे कोलिविर्ली येथे स्थायिक झाले. या कपलला तीन मुले झाली. त्यात दोन मुली आणि एक मुलगा आहे.
  - लग्नाच्या 14 वर्षांनी एप्रिल 2014 मध्ये स्टेसीने फ्रेड खोटारडा आणि दगाबाज असल्याचे कारण सांगत घटस्फोटासाठी अर्ज केला. लग्नानंतर फ्रेड दगा देत असल्याचे स्टेसी म्हणाली. शिवाय त्याने तिचा जीव घेण्याचाही प्रयत्न केला होता.
  - विभक्त झाल्यानंतर तिन्ही मुले फ्रेडसोबत राहतात. तर स्टेसी अधूनमधून मुलांना भेटते. घटस्फोटानंतर फ्रेड आनंदी असेल, असे स्टेसीला वाटले होते. पण त्याच्या डोक्यात वेगळेच काही शिजत होते. बदनामी होण्याच्या भीतीने फ्रेडने तिच्या हत्येची योजना आखली होती.
  फ्रेडने तीनदा केला होता स्टेसीला जीवे मारण्याचा प्रयत्न 
  - टूथपेस्टमध्ये विष असल्याचे सिद्ध झाल्यानंतर फ्रेडला अटक करण्यासाठी पोलिसांना आणखी पुरावे हवे होते. यासाठी पोलिसांनी एका व्यक्तीला सुपारी किलर बनवून फ्रेडकडे पाठवले.
  - पोलिसांनी पाठवलेली व्यक्ती फ्रेडकडे गेली असता, त्याने या व्यक्तीला स्टेसीचा जीव घेण्याची सुपारी दिली आणि सोबतच स्टेसी घरी कधी भेटेल याविषयी सांगितले.
  - या स्टिंगमध्ये अडकल्यानंतर पोलिसांनी फ्रेडला अटक केली. पण नंतर त्याची जामिनावर सुटका झाली. आता सुरक्षित झाल्याचे स्टेसीला वाटले होते, पण तसे घडले नाही.
  - जुलै 2015 मध्ये फ्रेडने तिस-यांना स्टेसीचा जीव घेम्याचा प्रयत्न केला. त्याने तुरुंगात असलेल्या एका कैदीशी संपर्क साधून त्याला सात लाख रुपयांचे आमिष दिले आणि स्टेसीची हत्या करण्यात सांगितले. पण पोलिसांना फ्रेडच्या या योजनेविषयी समजले.
  - कोर्टात खटला दाखल झाल्यानंतर टुथपेस्टमध्ये विष मिसळणे आणि पत्नीला जीवे मारण्यासाठी सुपारी दिल्याप्रकरणी फ्रेड दोषी आढळला. न्यायालयाने त्याला 30 वर्षांची शिक्षा सुनावली. त्यापैकी 10 वर्षांचा त्याला पॅरोल मिळू शकतो. 

  घटस्फोट घेतल्यानंतर बदनामीच्या भीतीने नव-याने पत्नीच्या टुथपेस्टमध्ये मिसळले होते विष.

  • Husband tried to kill his wife by poisoning her toothpaste after she filed for divorce

Post a Comment

 
Top