- अाैरंगाबाद- जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद तुंगार यांनी आपणास अरेरावीची भाषा वापरून धमकावल्याची तक्रार पुणे येथील प्रभारी सैनिक कल्याण संचालकांचे स्वीय सहायक तथा लघुलेखक संजय वाघ यांनी संचालक तथा अप्पर जिल्हाधिकारी रमेश काळे यांच्याकडे केली अाहे.
वाघ यांचे वडील १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धात शहीद झाले आहेत. तक्रारीत वाघ यांनी म्हटले अाहे, 'तुंगार यांच्या नेहमीच्या जाचाला अापण कंटाळलो अाहाेत. त्यांनी मानसिक खच्चीकरण न थांबवल्यास आपण पत्नी व मुलांसह आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्र्यांकडून अालेले निरोप अापण कार्यालयीन कामाचा भाग म्हणून तुंगार यांना दिले. मात्र, त्यांनी अापल्यावरच अागपाखड केली. माझ्या नावासमोर 'माजी मेजर' का लावतो म्हणून तुंगार नेहमी धमकावतात. २८ सप्टेंबरला त्यांनी मला धमकीही दिली, असे वाघ यांनी निवेदनात म्हटले अाहे.
धमकावयाला वेळ नाही
' वाघला धमकावयाला मला वेळ नाही. अनेक गोष्टींसाठी मागणी केली असता वाघ विलंब करतात. मी काही माझ्या घरचे काम त्यांना सांगत नाही. अनेक निरोप आपणास उशिरा दिले जातात. वाघ यांना ठरवून कुणीतरी माझ्याबद्दल सांगत आहे.- मेजर मिलिंद तुंगार, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी पुणे.
चौकशी करणार
संजय वाघ यांची तक्रार आपणास प्राप्त झाली असून, कार्यालयीन कामाच्या व्यग्रतेत संचालक कार्यालयात जाऊ शकलो नाही. तक्रारीच्या अनुषंगाने मेजर तुंगार यांची चौकशी करण्यात येईल. तसेच दोषी आढळल्यास आवश्यक कारवाई होईल. रमेश काळे प्रभारी, संचालक सैनिक कल्याण विभागवाघ यांचे वडील १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धात शहीद झाले आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a comment