0
पुणे- पुण्यातील गणेशोत्सव मिरवणूक पाहण्यासाठी देशविदेशातून माेठी गर्दी होत असते. मात्र, मागील काही वर्षांपासून मिरवणूक लांबली जाऊन त्याचा ताण पोलिसावर पडतो. यंदा मात्र मानाच्या ५ गणपती मंडळांनी मिरवणूक वेळेत काढण्याचा आणि २ मंडळांत केवळ १५ मिनिटे अंतर राहील, अशा प्रकारे नियोजन केले आहे. मानाच्या गणपतींचे कृत्रिम हौदात विसर्जन करण्याचाही निर्णय घेतल्याची माहिती कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शेटेंनी दिली आहे. दरम्यान, पर्यावरणपूरक उद्देशाने 'दिव्य मराठी'नेसुद्धा भाविकांनी घरच्या घरीच गणेशाचे विसर्जन करण्याचे आवाहन केले आहे.Visarjan of five main Ganapati in Pune will be in Artificial tank

Post a comment

 
Top