0
च्युक लॅगून- प्रशांत महासागरातील मायक्रोनेशियात शुक्रवारी एक विमान समुद्रात उतरवण्यात आले होते. पापुआ न्यू गिनीचे एअर न्यूगिनी ७३७ विमान मायक्रोनेशियाच्या दिशेने रवाना झाले होते. हे विमान विनो आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणे अपेक्षित होते. पण धावपट्टी २ किमीवर असताना अलीकडेच हे विमान समुद्रात उतरले. विमानातील सर्व ४७ प्रवासी व कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. काही प्रवासी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मायक्रोनेशियात च्युक विमानतळाचे महासंचालक जिमी एमिलिआे म्हणाले, नियोजित वेळेनुसार विमानतळावरच हे विमान उतरायला हवे होते, पण तेथे विमान उतरवण्याऐवजी चालकाने ते १ हजार ८३६ मीटर अगाेदरच समुद्रात उतरवले होते. विमानात ३६ प्रवासी व ११ विमान कर्मचारी होते. विमानातील एक प्रवासी म्हणाला, विमान खूपच पाण्याजवळून जात होते तेव्हाच आम्हाला दुर्घटना होईल, अशी शंका होती. पापुआ न्यू गिनिआ सरकारने विमान दुर्घटनेच्या चौकशीचे दिले आहेत. त्यासाठी लवकरच तपास पथक मायक्रोनेशियाला पोहोचेल. नियोजित वेळेपूर्वी विमान खाली उतरल्याने हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात सांगण्यात आले.

पूर्वीही घडल्या अशा घटना 
याच वर्षी जानेवारीत एक विमान धावपट्टीवरून घसरले होते, पण कोसळले नव्हते. २००९ मध्ये अमेरिकेच्या एअरवेजच्या एका वैमानिकाने विमानाला न्यूयॉर्क येथील हडसन नदीत उतरवले होते. दोन्ही इंजिनांत बिघाड झाल्याने ते नदीत उतरवले होते. दुर्घटना घडली तेव्हा त्यातून १५५ प्रवासी जात हाेते.

लोकसंख्या १ लाख, स्कूबा डायव्हिंगसाठी पर्यटकांचे मायक्रोनेशिया आवडते ठिकाण 
मायक्रोनेशिया ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेस व फिलिपाइन्सच्या पूर्वेकडील देश आहे. चार बेटांनी तयार झालेला हा देश आहे. देशाची एकूण लोकसंख्या १ लाख आहे. च्युक लॅगून बेटाच्या तिन्ही बाजूस पाण्याचा वेढा आहे. दुसऱ्या महायुद्धात जपानने या देशाला आपले तळ बनवले होते. लॅगून हे पर्यटकांना स्कूबा डायव्हिंगसाठी आकर्षित करणारे आहे.

हे विमान विमानतळावरचउतरायला हवे होते, पण तेथे विमान उतरवण्याऐवजी चालकाने ते १ हजार ८३६ मीटर अगाेदरच समुद्रात उतरवले.

  • Plane landed in the sea two kilometers away from airport

Post a comment

 
Top