0
मुंबई- 'रामायण, महाभारताची देशाला गरज नाही. मुस्लिम, ख्रिश्चन हे या देशाचेच घटक असून मला जेवढा अधिकार आहे तेवढाच अधिकार त्यांना आहे. ते देशाचे हिस्सेदार आहेत, हे कुणीही सांगण्याची आवश्यकता नाही. ते जन्मत:च या देशाचे नागरिक आणि हिस्सेदार आहेत', असा टाेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुस्लिमांबाबत वक्तव्य करणाऱ्या सरसंघचालक मोहन भागवत यांना लगावला. 'भारिप'चे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी पक्ष धर्मनिरपेक्ष नसल्याच्या टीकेलाही पवारांनी प्रत्त्युत्तर दिले. 'आमची मदत जेव्हा घेतली तेहा आम्ही धर्मनिरपेक्ष नव्हतो का?' असा प्रतिसवाल करत प्रकाश अांबेडकरांनी अाम्हाला धर्मनिरपेक्षता शिकवण्याची गरज नाही, असेही पवार यांनी ठणकावले.
  • NCP President Sharad Pawars Reaction On Mohan bhagwats Prakash Ambedkar Statementपवार म्हणाले, 'प्रकाश आंबेडकर म्हणतात, राष्ट्रवादी काँग्रेस धर्मनिरपेक्ष नाही. राष्ट्रवादी धर्मनिरपेक्ष नसता तर अकोल्यात दोन निवडणुकांत त्यांनी आमचा पाठिंबा घेतला नसता. तेथे प्रचाराला शरद पवार नव्हे तर राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते होते. तेव्हा ते धर्मनिरपेक्ष वाटत होते, मग आता का नाहीत. मला नक्की वर्ष आठवत नाही, परंतु ईशान्य मुंबईत आमच्या उमेदवाराला पाडण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाने नीलम गोऱ्हेंना उभे केले होते. त्याचा लाभ प्रमोद महाजनांना झाला होता. भाजपला लाभ पोहोचवण्यासाठी उमेदवार उभे करण्याची ऐतिहासिक कामगिरी करणारे लोक इतरांना कोण धर्मनिरपेक्ष आहे, कोण नाही, असे सांगत अाहेत' असा टाेलाही पवारांनी लगावला.

    छत्तीसगडमध्ये काँग्रेसची भूमिका आधीपासून निश्चित 
    छत्तीसगडमध्ये बसपच्या मायावती आणि अजित जोगी यांच्या पक्षासोबत केलेल्या युतीबाबत शरद पवार म्हणाले, छत्तीसगडमध्ये काँग्रेसची इतर पक्षांबरोबर जाण्याची तयारी नसल्याने या पद्धतीचे बोलणे यापूर्वीच सुरू होते. त्यामुळे त्यांनी अन्य पक्षाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला असेल.

Post a Comment

 
Top