0
  • Training, scholarship of IAS is now Doubleमुंबई- राज्यातील भारतीय प्रशासकीय सेवा पूर्वप्रशिक्षण केंद्रातील उमेदवारांच्या विद्यावेतनात २ हजार रुपयांवरून ४ हजार रुपये वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला अाहे. कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद, नाशिक व अमरावती येथे ही प्रशिक्षण केंद्रे अाहेत.


    विद्यावेतन वाढीची घाेषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात केली हाेती, त्याची अाता पूर्तता झाली अाहे. चालू शैक्षणिक वर्षापासूनच ही वाढ मिळेल. राज्यातील होतकरू, बुद्धिवान विद्यार्थ्यांना अायएएस व अायपीएससारख्या केंद्रीय लाेकसेवा अायाेगामार्फत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी प्रशिक्षण देण्याचे काम या केंद्रांमधून केले जाते. मात्र, यासाठी इच्छुक उमेदवारांना दिले जाणारे विद्यावेतन अगदीच कमी होते. हे विद्यावेतन अर्थसंकल्पातील घोषणेनुसार वाढवण्यात आले आ
    हे.

Post a Comment

 
Top