0
खुलताबाद- तालुक्यातील पिंपरी येथे एका तरुणीवर एका तरुणाने धमकी देऊन सतत अत्याचार केल्याची घटना घडली असून अमोल प्रकाश साळवे असे आरोपीचे नाव आहे. अमोल साळवेला खुलताबाद पोलिसांनी गजाआड केले आहे.
     
  • पिंपरी येथील १९ वर्षांची अपंग तरुणीला त्याच गावातील तरुण अमोल साळवे (२३) या तरुणाने तरुणी अपंग असल्याचा फायदा घेत गेल्या काही महिन्यांपासून धमकी देत सतत तिच्यावर अत्याचार करत राहिला. २४ सप्टेंबर रोजी ही तरुणी घराच्या ओट्यावर एकटी बसली असता आरोपी अमोल तेथे आला व तिला बळजबरीने घरात ओढून बलात्कार केला. बलात्कारानंतर त्याने जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना पीडितेने आईला सांगितली. आई व मुलीने खुलताबाद ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

    तालुक्यातील पिंपरी येथे एका तरुणीवर एका तरुणाने धमकी देऊन सतत अत्याचार केल्याची घटना घडलीअसून अमोल प्रकाश साळवे असे

    • Rape on handicapped girl in khuldabad


  •  

Post a comment

 
Top