0
भडगाव (जळगाव) - मोदींच्या राज्यात शेतकरी जीव देत अाहे. शेतकऱ्यांचे-गरिबांचे कर्ज माफ होत नाही. मात्र, धनाढ्यांचे मोठ्या बँकेतील कर्ज सरकार माफ करते. धनाढ्यांकडून कर्जाची वसुली होत नाही, दुसरीकडे शेतकऱ्याला वारंवार नोटिसा दिल्या जातात, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला. पेट्रोल-डिझेलचे रोज सातत्याने वाढत चाललेले दर म्हणजे विद्यमान राज्यकर्त्यांनी केलेला विक्रमच आहे, अशा शब्दांत पवार यांनी टीका केली.
 • रविवारी येथे आयोजित राष्ट्रवादीच्या मेळाव्यात ते बोलत होते. 
  माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी या वेळी सरकारवर घणाघात केला. ‘चलने की कोशिश तो करो, दिशाएं बहुत हैं’ असे अनेक शेर त्यांनी सुनावले. मोदींची नक्कल करत ‘भाइयो और बहनो’ म्हणत भुजबळ यांनी उपहासात्मक टीका केली. पेट्रोल दरवाढ, दिल्लीजवळ मुलींवर अत्याचार, सीमेवरील शहीद असे दाखले त्यांनी दिले.

  १३ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या
  खान्देश हा परिसर शेतीवर अवलंबून आहे, शेती करणाऱ्यांची परिस्थिती आज गंभीर आहे. गेल्या दोन वर्षांत १३ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांना न्याय मिळत नाही. सरकारने कर्जमाफीच्या घोषणा केल्या. मात्र, लाभ मिळताना दिसत नाही. कर्जमाफी अजून तळागाळापर्यंत पोहोचणे बाकी आहे. नाेटबंदीत नागरिकांचे माेठे हाल झाले आणि याचा लाभ श्रीमंतांनाच अधिक झाला, असे पवार म्हणाले.

  महागाई मोदी सरकारला महागात पडणार : रामदेवबाबा
  वाढती महागाई मोदी सरकारला महागात पडणार असल्याचे मत योगगुरू रामदेवबाबा यांनी मांडले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि नरेंद्र मोदी यांचे उघड समर्थन करणारे रामदेवबाबा २०१९ मध्ये भाजपचा प्रचार करणार नाहीत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक धोरणांवर नाराजी व्यक्त केलीSharad Pawar criticized Government over Petrol Rate Hike

Post a comment

 
Top