0
लेह- आमिर खानच्या 'थ्री इडियट्स' चित्रपटात रँचोची लडाखमधील शाळा तुम्हाला आठवत असेलच. चित्रपटात चतुर रामलिंगम शाळेची भिंत घाण करतो तेव्हा शाळेतील मुले त्याला शॉक देतात, असा एक सीन आहे. ही भिंत नंतर इतकी प्रसिद्ध झाली की तिला 'रँचो वॉल' नाव मिळाले. विद्यार्थ्यांनी या भिंतीवर त्या सीनचे चित्रही काढले. लडाखला येणारे पर्यटक आवर्जून या स्थळाला भेट देतात.लेह- आमिर खानच्या 'थ्री इडियट्स' चित्रपटात रँचोची लडाखमधील शाळा तुम्हाला आठवत असेलच. चित्रपटात चतुर रामलिंगम शाळेची भिंत घाण करतो तेव्हा शाळेतील मुले त्याला शॉक देतात, असा एक सीन आहे. ही भिंत नंतर इतकी प्रसिद्ध झाली की तिला 'रँचो वॉल' नाव मिळाले. विद्यार्थ्यांनी या भिंतीवर त्या सीनचे चित्रही काढले. लडाखला येणारे पर्यटक आवर्जून या स्थळाला भेट देतात
 • मात्र हीच लोकप्रियता शाळेसाठी अडचणीचे कारण ठरली. पर्यटकांच्या गर्दीमुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडचणी येऊ लागल्या. कॅम्पसमध्ये कचराही वाढू लागला. यामुळे ड्रूक पदामा कारपो शाळेच्या व्यवस्थापनाने ही भिंतच पाडून टाकली. कॅम्पसमध्ये पर्यटकांना प्रवेशबंदी करण्यात आली.

  शाळेच्या प्राचार्या स्तंजिन कुंजग म्हणाल्या, भिंतीसह चित्रपटाशी निगडित शाळेतील अनेक गोष्टी काढल्या जात आहेत. पाडलेल्या भिंतीसारखीच एक भिंत कॅम्पसबाहेर उभी करण्यात आली आहे. तिला सुसू पॉइंट नाव देण्यात आले आहे.

  चार कारणे, ज्यामुळे चित्रपटापेक्षा शाळा सरस 
  1 लाइफ स्किल : होस्टेल मेसमध्ये मुलांना जीवनाची कौशल्ये शिकवली जातात. दिनचर्या शिकावी म्हणून येथे भाजी चिरणे, भांडी घासणे, सामान आणण्याची कामे विद्यार्थीच करतात. 
  2 नेटिव्ह डे : लडाखची पारंपरिक भोजन संस्कृती टिकून राहावी म्हणून बुधवारी शाळेत नेटिव्ह डे साजरा केला जातो. या दिवशी पारंपरिक जेवणच तयार केले जाते. 
  3 आर्ट रूम : शाळेतील टाकाऊ वस्तूंचा विद्यार्थी पुनर्वापर करून त्या आर्ट रूममध्ये वापरल्या जातात. त्यावर विद्यार्थी पेंटिंग करतात वा नवीन वस्तू तयार करतात. 
  4 मॅथ लॅब : शाळेत मुले गणिताचे अवघड प्रश्न पुस्तके नव्हे, तर कार्यानुभवातून शिकतात. यासाठी कॅम्पसमध्ये मॅथ लॅब तयार करण्यात आली आहे. बसण्याची व्यवस्थाही वेगळी असते.
  'Rancho wall' has big impact on children's education; school break down that wall

Post a comment

 
Top