0
सोलापूर- सात- बारा उतारा देण्यासाठी सव्वादोन लाख रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी तलाठ्याला चार वर्षे, तर त्याच्या खासगी सहायकाला तीन वर्षे सक्तमजुरी अशी शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. व्ही. सावंत - वाघुले यांनी मंगळवारी सुनावली. हा प्रकार दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी स्टेशन गावातील आहे.

तलाठी जालिंदर कलप्पा सपताळे (वय ५३, रा. गावडेवाडी, पोस्ट कंदलगाव, ता. दक्षिण सोलापूर) याला चार वर्षे सक्तमजुरी, त्याचा खासगी सहायक बापू शंकर कोकरे (वय ५३, रा. होटगी स्टेशन, ता. दक्षिण सोलापूर) यास तीन वर्षे शिक्षा झाली. ही घटना होटगी स्टेशन गावातील असून कारवाई सदर बझार पोलिस स्टेशनच्या हद्दीत चार मार्च २०१० रोजी झाली होती. याबाबत होटगी परिसरातील एका व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर यांच्याकडे तक्रार केली होती.

संबंधित व्यक्तीने होटगी परिसरात ८४ प्लॅाट पाडून तीस प्लॉटची विक्री केली होती. सात प्लॉटची विक्री १७ फेब्रुवारी २०१० रोजी करण्याचे ठरले होते. प्लॉट विक्री व्यवहारासाठी सातबारा उताऱ्याची आवश्यकता होती. यासाठी होटगी स्टेशन गावचे तलाठी सपताळे यांच्याकडे सातबारा उताऱ्याची मागणी केली होती. त्यावेळी सपताळे यांनी बापू कोकरे याने तुमचे प्लॉट बेकायदेशीर असल्याची तक्रार केल्याने चौकशी होईपर्यंत प्लॉट विक्री करता येणार नाही, असे सांगितले. त्यामुळे संबंधित व्यक्ती, त्यांचे नातेवाईक तलाठी यांना भेटले. त्यावेळी तडजोड करून खासगी व्यक्ती तलाठी यांच्यासाठी एकूण सव्वादोन लाख रुपये पैसे देण्याची मागणी झाली. याबाबत एसीबी पथकाकडे तक्रार दिल्यानंतर दोघांना लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. तत्कालीन पोलिस निरीक्षक शंकर चव्हाण यांनी तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. ही घटना सिद्ध झाल्याने न्यायाधीशांनी शिक्षा सुनावली. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह रजपूत, आरोपीतर्फे एम. एम. अग्रवाल या वकिलांनी काम पाहिले.

ही घटना होटगी स्टेशन गावातील असून कारवाई सदर बझार पोलिस स्टेशनच्या हद्दीत चार मार्च २०१० रोजी झाली होती.

  • Sentenced to 4 years jail for taking bribe of 2 lakh

  • Sentenced to 4 years jail for taking bribe of 2 lakh

Post a comment

 
Top