- पुणे- पिंपरीतील रमाबाईनगरात घरासमाेर खेळताना बेपत्ता झालेल्या एका सातवर्षीय मुलीचा पिंपरीतील एचए मैदानावर मृतदेह आढळून आला आहे. धनश्री पुणेकर या मुलीचे नाव असून तिची अत्याचारानंतर हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे.
साेमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास धनश्री घरासमाेर खेळत हाेती. त्या वेळी अचानक तिला काेणी तरी पळवून नेले. दरम्यान, धनश्री घराबाहेर नसल्याने पालकांनी शाेध घेतला. मात्र, ती सापडली नाही. पालकांनी याबाबत पिंपरी पोलिसांत तक्रार दिली. तीन दिवस तिचा शोध चालला. गुरुवारी सकाळी पिंपरीतील एचए कंपनीच्या मैदानावर एका मुलीचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन खातरजमा केली असता ती धनश्रीच असल्याचे स्पष्ट झाले. धनश्रीवर अत्याचार झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. शवविच्छेदन अहवालानंतर याबाबत अधिक माहिती मिळेल, असे सांगितले आहे.साेमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास धनश्री घरासमाेर खेळत हाेती. त्या वेळी अचानक तिला काेणी तरी पळवून नेले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a comment