0
जकार्ता- भारताच्या स्वप्ना बर्मनने हेप्टाथलॉनमध्ये सुवर्णपदक जिंकले. या खेळात भारताचे आशियाई स्पर्धेत पहिले पदक आणि स्वप्नाने आशियाई स्पर्धेतील भारताचे एकूण १५० वे सुवर्णपदक पटकावले. २१ वर्षीय स्वप्ना सात खेळांच्या हेप्टाथलॉनमध्ये ६०२६ गुणांसह अव्वलस्थानी राहिली. तिची वैयक्तिक सर्वोत्कृष्ट कामगिरीदेखील ठरली. चीनच्या वांग किंगलिंगने (५९५४) रौप्यपदक आणि जपानच्या युकी यामासाकीने (५८७३) कांस्यपदक मिळवले. या प्रकारात भारताच्या पूर्णिमा हेम्ब्रेमला (५८३७) चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
 • कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी खेळली कमी महत्त्वाच्या स्पर्धा
  जलपाईगुडीची २१ वर्षीय स्वप्ना बर्मनचे वडील पंचानन रिक्षा चालवत, मात्र २०१३ पासून अर्धांवायूमुळे अनेक दिवसापासून अंथरुणाला खिळून आहेत. स्वप्नाची आई चहाच्या मळ्यात काम करते. हलाखीमुळे तिला आवश्यक आहारदेखील मिळत नव्हता. स्वप्ना कुटुंबीयांना आर्थिक मदत व्हावी यासाठी कमी महत्त्वाच्या स्पर्धेत खेळते. कारण त्या स्पर्धेतून मिळणाऱ्या बक्षिसाच्या रकमेतून घरच्या आवश्यक गरजा पूर्ण करत होती.

  दुसरे आंतरराष्ट्रीय पदक 
  स्वप्नाला दोन दिवसांपासून दातदुखी होती. त्यामुळे तिने बँडेज लावून स्पर्धेत सहभाग घेतला. हे तिचे दुसरे आंतरराष्ट्रीय पदक ठरले. तिने गेल्या वर्षी भुवनेश्वर येथे झालेल्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण जिंकले होते. भारताचे हेप्टाथलॉनमधील हे एकूण सहावे पदक ठरले.

  अर्पिंदरने ४८ वर्षांनी तिहेरी उडीत जिंकले सुवर्ण
  अर्पिंदर सिंगने तिहेरी उडीत १६.७७ मीटर उडी घेत सुवर्णपदक पटकावले. राष्ट्रकुल स्पर्धेत चौथ्या स्थानी राहिलेल्या अर्पिंदरने तिहेरी उडीत ४८ वर्षांनंतर भारताला सुवर्ण मिळवून दिले. अर्पिंदरची वैयक्तिक १७.१७ मीटरची उत्कृष्ट कामगिरी असून त्याने २०१४ च्या राष्ट्रीय स्पर्धेत केली होती. अखेरच्या वेळी १९७० मध्ये मोहिंदर सिंगने पदकाची कामगिरी केली होती. स्पर्धेच्या इतिहासात भारताचे हे केवळ सातवे पदक ठरले. उझ्बेकिस्तानच्या रूस्लान कुरबानोवने १६.६२ मीटर उडीसह रौप्यपदक आणि चीनच्या शुओ काओने १६.५६ मीटरसह कांस्यपदक जिंकले. भारताचा राकेश बाबू सहाव्या स्थानी राहिला.

  दुतीला दुसरे रौप्यपदक 
  दुतीचंदने २०० मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकले. दुतीने ही शर्यत २३.२० सेकंदांत पूर्ण केली. बहारीनची एडिडियोंग ओडियोंगने २२.९६ सेकंदाची वेळ घेत सुवर्णपदक मिळवले. १०० मीटर शर्यतीतदेखील ओडियोंगने दुतीला मागे सोडत सुवर्ण जिंकले होते. चीनची योंगली वेईने २३.२७ सेकंदांत कांस्यपदक पटकावले.

  टेबल टेनिस : शरत कमल, मनिकाला मिश्र दुहेरीत कांस्य
  आशियाई स्पर्धेत भारताला टेबल टेनिस स्पर्धेत एकही पदक नव्हते. यंदा भारतीय पुरुष संघाने कांस्यपदक आणि बुधवारी अचंत शरत कमल व मनिका बत्राने मिश्र दुहेरीत कांस्यपदक पटकावले. 
  उपांत्य फेरीत शरत आणि मनिका जोडीला चीनच्या चूकिन वांग आणि यिंगशा सून या जोडीकडून ९-११, ५-११, १३-११, ४-११, ८-११ ने पराभूत होत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. चीनच्या जोडीने हा सामना ३९ मिनिटात समाप्त केला. आता या खेळाडूंचे एकेरीत आव्हान अद्याप कायम आहे. दुसरीकडे मिश्र दुहेरीत दुसरी भारतीय जोडी अँथनी अमलराज व मधुरिका पाटकरला अंतिम १६ च्या फेरीत हाँगकाँगच्या क्वान कित हो आणि हो चिंग ली या जोडीने ६-११, ११-७, ११-५, ११-४ ने पराभूत केले.

  हॉकी : चीनला नमवत महिला संघ २० वर्षांनी फायनलमध्ये 
  भारतीय महिला हॉकी संघाने फायनलमध्ये प्रवेश केला. सेमीफायनलमध्ये भारताने चीनला १-० ने मात दिली. विजेत्या संघाकडून एकमेव गोल गुरजित कौरने ४५ व्या मिनिटाला केला. भारताने २० वर्षांनी फायनलमध्ये धडक मारली. १९९८ मध्ये अंतिम फेरीत द. कोरियाने हरवले होते. भारतीय संघ चॅम्पियन बनला तर २०२० टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रता मिळवेल. भारतात एकदा चॅम्पियन बनला होता. शुक्रवारी फायनलमध्ये भारतासमोर जपानचे आव्हान असेल.

  व्हॉलीबॉल : भारतीय महिला संघाने हाँगकाँग संघाला हरवले
  भारतीय महिला व्हॉलीबॉल संघाने १८ व्या आशियाई स्पर्धेत १२ व्या स्थानासाठी पात्रता फेरीच्या सामन्यात हाँगकाँगच्या संघाला ३-० ने पराभूत केले. भारतीय संघाने शानदार प्रदर्शन केले. भारताने २५-१८, २५-१६, २५-१३ ने सामना आपल्या खिशात घातला. हा सामना १ तास १० मिनिटांत समाप्त झाला.

  नौकानयन : ५०० मीटर शर्यतीत भारतीय पुरुष टीम फायनलमध्ये
  भारतीय नौकानयन टीमने पहिल्या उपांत्य फेरीत दुसरे स्थान मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. भारतीय संघात सेल्वाराज एल्बर्ट, अरामबम चिन सिंग, लाइतोनजाम सिंग आणि बारोई पुरोहित यांनी ही शर्यत पूर्ण करण्यासाठी १ मिनिट ३३.५८७ सेकंदांचा वेळ घेतला. या क्रीडा प्रकाराची फायनल गुरुवारी होईल. यापूर्वी भारतीय संघाने पहिल्या हिटमध्ये पाचवे स्थान राखले होते. यात टीमने १ मिनिट ३७.५४९ सेकंदांचा वेळ घेतला होता.

  बॉक्सिंग : अमित पंघल, विकास कृष्णनने केली पदके पक्की
  भारतीय बॉक्सर अमित पंघलने पुरुष गटात ४९ किलो लाइट फ्लायवेट आणि विकास कृष्णनने ७५ किलो मिडलवेट गटात आपापले सामने जिंकत बुधवारी उपांत्य फेरीत प्रवेश करत पदके पक्की केली आहेत. दुसरीकडे महिलांच्या ५१ किलो गटात सरजूबालाला पराभवाचा सामना करावा लागला. सेनादलाच्या २२ वर्षीय अमितने क्वार्टर फायनलमध्ये उत्तर कोरियाच्या जांग रियोंग किमला ५-० ने एकतर्फी पराभूत केले. पदकाचा दावेदार असलेल्या विकासने चीनच्या तुहेता एरबिएक तंगलाथियानला संघर्षपूर्ण लढतीत ३-२ ने हरवले. भारताचा धीरज पराभूत झाला.

  सॉफ्ट टेनिस : मिश्र दुहेरी गटात नमिता, अनिकेत जोडीचा पराभव
  भारताच्या नमिता सेठ व अनिकेत पटेल आणि रोहित धीमान व आद्या तिवारी या दोन्ही जोड्यांना सॉफ्ट टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीत बुधवारी पराभवाचा सामना करावा लागला. क गटात रोहित व आद्या जोडीला चीन तैपेईच्या काइवेन यू आणि चुलिंग चेंग जोडीने ०-५ ने मात दिली. नमिता व अनिकेत जोडीला जपानच्या तोशिकी उएमात्सू
  Swapna get first gold in the Heptathlon
 •  व िरको हायाशिदाने ०-५ ने हरवले.

Post a comment

 
Top