शेतकऱ्यांचे विविध प्रश्न, तसेच लोकपाल, लोकायुक्तांची नियुक्ती यासाठी हजारे यांनी यापूर्वी दिल्लीत रामलीला मैदानावर उपोषण केले होते. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री गिरीश महाजन यांनी मध्यस्थी करून अकरा मुद्द्यांवर लेखी आश्वासन केंद्र सरकारच्या वतीने दिले होते. सहा महिन्यांत त्यांची पूर्तता झाली नाही तर आपण उपोषण करू, असे त्याच वेळी हजारे यांनी सांगितले होते. पाच महिने झाले तरी सरकारी पातळीवर कुठल्याही हालचाली नसल्याने २ ऑक्टोबरपासून आंदोलन करण्याचा निर्णय हजारे यांनी घेतला. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी गिरीश महाजन यांनी पुन्हा राळेगणसिद्धी गाठले. सत्तर टक्के मागण्या पूर्ण झाल्या असून येत्या काही दिवसांत उर्वरित मागण्या पूर्ण होतील. त्यामुळे आंदोलन मागे घ्यावे, अशा विनंती त्यांनी हजारे यांना केली. परंतु सर्व मागण्या प्रत्यक्षात पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलनापासून बाजूला हटणार नसल्याचे हजारे यांनी स्पष्ट केले.
तूर्त अांदाेलन करू नका
लोकपाल, लोकायुक्त आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांवर केंद्र आणि राज्य सरकार काम करत असून त्यातील बऱ्याच पूर्ण झाल्या अाहेत. उर्वरित मागण्यांवर चर्चा सुरू असून लवकरच त्या पूर्ण करण्याचे आश्वासन मी अण्णांना दिले. तसेच तूर्त त्यांनी आंदोलन करू नये, अशी विनंती केली.
- गिरीश महाजन, जलसंपदामंत्री.
अाता थांबणार नाहीच
मुख्यमंत्र्यांबरोबरचर्चा झाली, पण सरकार फक्त आश्वासन देत आहे. मार्चमधील आंदोलनात सरकारने आश्वासन दिले होते, परंतु पुढे काही निर्णय झाला नाही. पंतप्रधान कार्यालयातून उत्तर मिळत नाही तोपर्यंत आंदोलन करणार अाहोत. सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत थांबणार नाही. 
- अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक.
Post a Comment