- लंडन- ईशांत शर्मा (३/२८), रवींद्र जडेजा (२/५७) अाणि जसप्रीत बुमराहच्या (२/४१) शानदार गाेलंदाजीमुळे इंग्लंडची पाचव्या कसाेटीच्या पहिल्या डावात दिवसअखेर चांगलीच दमछाक झाली. त्यामुळे टीमला शुक्रवारी ७ गड्याच्या माेबदल्यात १९८ धावा काढता अाल्या.
करिअरमधील शेवटची कसाेटी खेळत असलेला कुक (७१) अाता फाॅर्मात अाला अाहे. त्याने शेवटच्या कसाेटीच्या पहिल्या डावात अर्धशतक झळकावले. तसेच माेईन अलीने ५६ धावांचे याेगदान दिले. भारताकडून ईशांत शर्माने ३ विकेट घेतल्या. तसेच अश्विनच्या जागी पाचव्या कसाेटीसाठी झालेली निवड जडेजाने याेग्य ठरवली. जडेजा अाणि बुमराहने प्रत्येकी दाेन गडी बाद केले.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडला सलामीच्या जेनिंग्स अाणि कुक यांनी दमदार सुरुवात करून दिली. त्यांनी संघाला अर्धशतकी भागीदारीची सलामी दिली. त्यांनी ६० धावांची भागीदारी रचली.
हनुमाचे पदार्पण
हनुमा विहारीने टेस्ट करिअरला सुरुवात केली. यासह ताे भारताचा २९२ वा कसाेटीपटू ठरला. ताे १८ वर्षांनंतर कसाेटीत भारताचे प्रतिनिधित्व करणारा अांध्र प्रदेशचा पहिला खेळाडू ठरला.
कुकचा झंझावात
शेवटच्या कसाेटीत कुक फाॅर्मात अाला. त्याने ७१ धावांची खेळी केली. त्याने अर्धशतकही साजरे केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment