नाशिक- इगतपुरीमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तिघांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. या प्रकरणात आरोपी कुणाल हरकारेला पोलिसांनी इगतपुरीमधूनच अटक केली आहे.
मिळालेली माहिती अशी की, तिघेही गणपती विसर्जन पाहण्यासाठी आले होते. यादरम्यान दोन गटात किरकोळ कारणारून वाद झाला. यातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. जखमींना नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment